लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा आहे. त्याचं वितरण लवकरच होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा पात्र लाभार्थी महिलांना आहे. राज्य सरकारनं लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपये वर्ग केले आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणींना लवकरच सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम शासनाकडून अदा केली जाऊ शकते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी रुपये वर्ग करण्यासंदर्भात शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

Ladki Bahin Yoajna : लाडक्या बहिणींना सप्टेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा

महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. तेव्हापासून म्हणजेच जुलै 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंत 14 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींना मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आले होते. आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. याच हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 410 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी लागणार

महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करताना महत्त्वाचा निकष ठेवला होता, तो निकष म्हणजे ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्याच कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरतील. आता लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचं उत्पन्न निकषाप्रमाणं आहे की नाही हे शोधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या ई केवायसी प्रक्रियेत लाडक्या बहिणींना त्यांच्या आधार कार्डची पडताळणी करावी लागेल. याशिवाय पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची देखील पडताळणी करणं आवश्यक आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया दोन महिन्यांमध्ये पूर्ण करायची आहे.

लाडक्या बहिणींची संख्या घटणार

महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करताना काही निकष ठेवण्यात आले होते. त्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळलं जाईल. काही दिवसांपूर्वी एकाच कुटुंबातील तीन महिलांनी लाभ घेतल्यासंदर्भातील माहिती समोर आल्यानंतर गृहभेटी देऊन चौकशी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाडकी बहीणच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon