सांगोला शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर; बुधवार दि.11 जून 2025

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Sangola Breaking News; महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, सांगोला तालुक्यातील घडामोडी पाहा एका क्लिकवर, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडे्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

रोटरी क्लब सांगोला यांचा सिंहगड पब्लिक स्कूल कमलापुर येथे शालेय RYLA हा कार्यक्रम संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने सिंहगड पब्लिक स्कूल कमलापुर येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी RYLA हा कार्यक्रम घेण्यात आला. रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी घेतला जातो. इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.यामध्ये विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून त्यांचे पुढील उद्दिष्ट काय आहे व ते साध्य करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. या मध्ये मार्गदर्शना बरोबरच विविध खेळ घेतले जातात.या कार्यक्रमा अंतर्गत 307 विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला व प्रत्येकास सर्टिफिकेट देणार झाले.
या कार्यक्रमास सिंहगडचे कॅम्पस प्रमुख रो.अशोक नवले व शाळेच्या मुख्याध्यापिका चैताली मराठे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे, सचिव रो.इंजि.विलास बिले, रो.इंजि.संतोष भोसले,रो.माणिक भोसले सो,रो. साजीकराव पाटील सर,रो. इंजि.अशोक गोडसे,रो.श्रीपती आदलिंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक वर्ग व स्टाफ उपस्थित होते.

विद्यार्थी शिवसेनाप्रमुख अजिंक्यराणा शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

यश अपयश न पाहता युवकांनी ध्येय बाळगून काम करावे-मा. आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला (प्रतिनिधी ):-जीवनात काम करीत असताना यश, अपयश न पाहता युवकांनी ध्येय बाळगून काम केल्यास यश प्राप्ती होते. विद्यार्थी सेनेचे अजिंक्यराणा शिंदे यांच्या नावात ताकद आहे व त्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे उभे राहू तसेच प्रत्येक युवकाने यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल तर आई-वडिलांची सेवा करा व गुरु तसेच भगवंतांचे नाव घ्या काही कमी पडणार नाही असे मत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना तालुकाप्रमुख अजिंक्यराणा शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात हर्षदा लॉन्स सांगोला येथे मत व्यक्त केले.
माझ्या पहिल्या निवडणुकीचे नियोजन शिक्षक नेते रमेश शिंदे यांनी केले व सुखाच्या दुःखाच्या वाटेत विजय दादा शिंदे बरोबर आहे त्यामुळे शिंदे घराणे प्रामाणिक आहे व आपण आमदार असताना व नसताना सुद्धा विकासाच्या कामासाठी मागे राहणार नाही व काय डोंगर झाडी यामुळे तर आपले नाव जगात झाले आहे व अजिंक्य यांनी सांगोल्याच्या विकासासाठी योगदान द्यावे असे मतही पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख शंकर दुधाळ, माजी सरपंच बाळासो शिंदे, माजी सरपंच विजय दादा शिंदे, भाजपाचे श्रीकांत दादा देशमुख, माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, शिवसेनेचे प्रमुख साईनाथ अभंगराव, प्रा.संजय देशमुख, शिवसेना तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे, व सत्कारमूर्ती अजिंक्यराणा शिंदे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख चरणदास चौरे, लक्ष्मीकांत ढोंगे पाटील, दिलीप कोल्हे, शिवसेनेचे नेते सागर पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, इंजि.रमेश जाधव, अरविंद केदार, जगदीश पाटील, अभिजीत नलवडे, दीपक दिघे, अतुल पवार, सुभाष इंगोले, विष्णू पाटील, अनिल इंगोले, जगन्नाथ भगत गुरुजी, राम बाबर, सोमेश यावलकर, माऊली राऊत, रविराज शिंदे, समाधान शिंदे, साहेबराव शिंदे, प्रसाद शिंदे, डॉ.शिवराज भोसले, योगेश देवकुळे, नितीन रणदिवे, बापू माने, शिवाजी शिंदे, भैय्यासाहेब बंडगर, विष्णुपंत केदार, प्रताप इंगोले, संजय करडे, डीपी कारंडे, गणेश कमले, शिवाजी शिंदे, विकास मोहिते, सर्जेराव मोहिते ,बाळासो खुळपे, सचिन सादिगले, बिभीषण सावंत, बाळासो चवरे, शिक्षक वृंद, ग्रामस्थ, नातेवाईक, अजिंक्यराणा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन भारत मुढे यांनी तर आभार तात्यासो शिंदे यांनी मानले.

जवळे पंचक्रोशीमध्ये वटपोर्णिमा व कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात साजरा

जवळे (प्रशांत चव्हाण):- हिंदू धर्मातील पवित्र मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण महिला वर्गाकडून मंगळवार दि.10 जून 2025 रोजी जवळे गाव व पंचक्रोशीतील आगलावेवाडी, बुरंगेवाडी, तरंगेवाडी, भोपसेवाडी येथे मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांनी एकमेकींना दिवसभर सोशल मीडियावर वटपौर्णिमा सणाच्या शुभेच्छा दिल्या.
कारहूणवी निमित्ताने जवळा परिसरातील पशुपालकांनी आपल्या पशुधनाला अंघोळ घालून त्याला नवीन दोरखंड, घागरमाळा पाठीवर झूल चढवून तसेच शिंगांना गोंडे लावून सजवले होते. त्यांची मनोभावी पूजा करून पशुधनाला पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. बळीराजाला वर्षभर साथ देणार्‍या पशुधनाप्रति खरी कृतज्ञता व्यक्त करून कारहुणवीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

पुजारवाडी शाळेत शैक्षणिक प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख उपस्थित राहणार

सांगोला (प्रतिनिधी):- सध्या नवीन शैक्षणिक वर्षाची लगबग चालू झाली असून मा.मुख्यमंत्री यांच्या सुनियोजित आदेशानुसार राज्यातील सर्व पदाधिकारी यांना शाळेच्या प्रथम दिवशी सोमवार दि.16 जुन 2025 रोजी भेट देऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख हे पीएमश्री पुजारवाडी शाळेत पहिल्या दिवशी सुनियोजित भेट होणार आहे व त्यानुसार वरिष्ट पातळी वरून तसा सूचना प्राप्त झाल्या असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री.संतोष नवले यांनी दिली.
त्यानुसार सर्व नियोजन शाळा स्तरावर केले आहे यामध्ये नवागत मुलांचे स्वागत,गणवेश वाटप, पुस्तक वाटप, वृक्षारोपण, नवीन पाचवी वर्ग सुरु करणे असा कार्यक्रम होणार आहे, तेंव्हा शालेय परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे शालेय व्यवस्थापन समितीकडून आवाहन करण्यात येत आहे.

पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कारचे ज्ञान आत्मसात करा- भाऊसाहेब रूपनर
फॅबटेक विद्यार्थ्यांचे अकोला मध्ये विशेष श्रम संस्कार शिबीर

सांगोला (प्रतिनिधी):- देशाचा जबाबदार नागरीक म्हणून विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे. समाजासाठी गावासाठी सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे. या गावात डिजिटल साक्षरता अभियान, सामाजिक अडी-अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गावातील नागरिकांना स्वच्छतेच महत्त्व पटवून द्या. वृक्षारोपण, नदी स्वच्छता आदींसह अनेक कार्यक्रम या शिबिराच्या माध्यमातून राबवत असताना विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्काराचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी बोलताना व्यक्त केले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील विद्यार्थ्यांचा अकोला (ता. सांगोला) येथे मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उप-प्राचार्या डॉ.विद्याराणी क्षीरसागर, सरपंच धनश्री गव्हाणे, प्रमुख पाहुणे शहाजी गडहिरे, स्टुडंट डिन डॉ. संजय पवार आदींच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा अकोले ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राहूल पाटोळे यांनी केले.
या शिबिरामध्ये पोलीस पाटील गणेश खटकळे, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उप-प्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे आदींनी उपस्थितांना संबोधित केले.
या शिबिरामध्ये प्रा. ज्योती शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहूल पाटोळे, प्रा. चैञाली धुमाळ, अझर तांबोळी, प्रशांत गोडसे, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी अन्नुर मुलाणी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुमारी अर्पिता शिंदे हिने केले.

सामूहिक शेतीच्या माध्यमातून आर्थिक उन्नती शक्य- दिपाली जाधव

सांगोला (प्रतिनिधी):- दिनांक 10 जून 2025 रोजी विकसित कृषी संकल्प अभियान द्वारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ जिल्हा सोलापूर तसेच कृषी विभाग ,सांगोला महाराष्ट्र शासन आत्मा सोलापूर व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर आणि भारतीय भरडधान्य संशोधन संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गावोगाव जाऊन नवनवीन तंत्रज्ञान त्यामध्ये बीबीएफ तंत्रज्ञान, तूर शेंडा खुडनी, सुपर केन नर्सरी, जलतारा, पशुसंवर्धन, माती परीक्षण या विविध विषया वर कृषी संकल्प रथ कमलापूर, य. मंगेवाडी, आजनाळे या गावी फिरवून मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी सौ. दिपाली जाधव मॅडम बोलत असताना गटशेती करण्याचे आवाहन केले. गटशेतीचे अनेक फायदे आहेत. या माध्यमातून शेतकरी एकत्र येऊन शेती करतात, ज्यामुळे त्यांना अधिक फायदा होतो. गटशेतीमुळे शेती निविष्ठा, मनुष्यबळ आणि इतर संसाधने एकत्रितपणे वापरता येतात, ज्यामुळे खर्चात बचत होते आणि उत्पादकता वाढते. तसेच गट असणार्‍यांना विविध बियाणे 100 टक्के अनुदानावर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले, यामध्ये श्री.तानाजी वाळकुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
डॉ. स्वाती कदम यांनी सुपर केन नर्सरी व बीबीएफ तंत्रज्ञान, डॉ. विशाल वैरागर यांनी जलतारा व दामिनी प तसेच डॉ.बसवराज रायगुंड, राष्ट्रीय भरडधान्य संस्था सोलापूर यांनी विविध भरड धान्यांविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.29 मे 2025 पासून सुरू होणार्‍या विकसित कृषी संकल्प रथ गावोगाव फिरवून मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी श्री.भांगे, उपकृषि अधिकारी श्री.चव्हाण, सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती. वाघमारे मॅडम, कु. गायकवाड मॅडम, श्री. व्ही. व्ही. पाटील, श्री.कुंभार, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा श्री. सोनवणे तसेच गावातील सरपंच, उपसरपंच व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

अवैध वाळू उपसा: सांगोला पोलीसांकडून सोनंद येथे जेसीबी जप्त

सांगोला (प्रतिनिधी):- शासनाची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता, शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या वाळुचा उपसा प्रकरणी सोनंद ता.सांगोला येथे सांगोला पोलीसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.पोलीसांनी 10 लाख रुपये किंमतीचा पिवळ्या रंगाचे जेसीबी मशिन जप्त केले आहे तर टेम्पो चालकाने एक ब्रास वाळू सह टेम्पो पळवून नेला आहे. घटनेची फिर्याद पोकॉ. लक्ष्मण बापु वाघमोडे यांनी दिली आहे.
याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मौजे सोनंद गावचे हद्दीत कोरडा नदीचे पात्रात, यल्लमा मंदीराचे बाजुला, मराठी शाळेच्या लगत, काही इसम हे जेसीबी च्या साहयाने चारचाकी वाहनामध्ये, अवैध्यरीत्या वाळू उपसा करुन, त्याची स्वतःच्या आर्थीक फायद्याकरीता, वाहतुक करुन विक्री करत असल्याची बातमी मिळाली होती.सदर ठिकाणी मी, पोहवा काझी, पोहवा वजाळे, पोकों पांढरे असे खाजगी वाहनाने गेले. त्यावेळी नदीपात्रात वाहने नेता येत नसल्याने गावाचे बाजुला वाहने लावुन नदीपात्रात पोलीस पथकासह चालत गेले. तेथे एक पिवळ्या रंगाचा जेसीबी मशिनच्या सहायाने टेम्पो मध्ये वाळु भरत असल्याचे आढळून आले. जेसीबी व टेम्पो चे जवळ जात असल्याची चाहुल लागताच टेम्पोवरील चालक हा त्याचे ताब्यातील टेम्पो घेवुन पळुन गेला. वाळु भरत असणारा जेसीबी आम्ही जागीच पकडला असुन चालकासह सांगोला पोलीस ठाण्यास घेवुन आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- येथील डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला अंतर्गत शिक्षक-पालक सभा समितीमार्फत सोमवार, दि. 09.06.2025 रोजी प्रमुख पाहुणे प्रा. संतोष जाधव सर यांच्या उपस्थितीत शिक्षक-पालक सभा संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.डॉ. गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे पुढे म्हणाले की, शिक्षक-पालक भेटणे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. सभेमध्ये पालकांची अपेक्षा काय आहेत, शिक्षकांकडून काय अपेक्षा आहेत तसेच संस्थेच्या काय अपेक्षा आहेत इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
पालक मनोगतामध्ये श्री. महेश बंडगर, श्री. खंडागळे इत्यादी पालकांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिव विठ्ठलराव शिंदे सर आपल्या अध्यक्षीय मनोगतात शिक्षक-पालक सभेला मार्गदर्शन केले. गैरहजर विद्यार्थ्यांची माहिती वेळेत पालकांना शिक्षकांनी द्यावी व महाविद्यालयात उपस्थितीसाठी प्रयत्न करावा. पालकांची विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून त्यांना प्रवेश निश्चित करावा. तसेच शिक्षक व पालक यांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनाकडे लक्ष द्यावे. आपली तरुण पिढी ही भारताचे भविष्य आहे. या सभेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी चर्चा होते. तसेच पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगावे.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षक-पालक समितीचे चेअरमन डॉ.काकासाहेब घाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.दीपक शिंदे सर यांनी मानले.
कार्यक्रमास संस्था सदस्य प्रा.दीपक खटकाळे, प्रा.मारुती हाके, प्रा.हनुमंत कोळवले यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

खरेदी विक्री संघाच्या वतीने श्री तुकाराम भुसनर सर यांचा सत्कार संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- डिकसळ आश्रम शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री तुकाराम भुसनर सर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत त्याबद्दल सांगोला तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री रमेश जाधव, संचालक श्री तानाजी काका पाटील, श्री नारायण बापू जगताप, श्री हरिभाऊ इंगोले, श्री वैभव केदार, श्री पोपट गडदे, श्री दीपक चोथे, श्री बिरा चोरमले, श्री धोंडीबा जानकर, श्री सुभाष पाटील, श्री विशालदीप बाबर, श्री कृष्णदेव भोसले, श्री प्रल्हाद येलपले, श्री चंद्रशेखर ताटे, श्री मारुती हातेकर, सौ सिंधू कोळवले, श्रीमती उषादेवी लोखंडे, सचिव सुरेश सुरवसे, श्री बबन पाटील व सेवक वर्ग उपस्थित होते.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon