टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोल्यात भीषण अपघात: अनियंत्रित टमटमने बैलगाड्यांना उडवले; एका महिलेसह बैलाचाही जागीच मृत्यू

बैलगाडीतील पाच भाविक जखमी; बिरोबा यात्रा उरकून येताना अपघात

सांगोला : आरेवाडी येथील बिरोबा देवाची यात्रा करून घराकडे परतणाऱ्या दोन बैलगाड्यांना टमटमने पाठीमागून जोराची धडक दिल्याने महिला भाविकाचा जागीच मृत्यू झाला तर बैलगाडीतील पाच भाविक जखमी झाले. या अपघातात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला तर तीन बैल जखमी झाले.

अपघात घडताच टमटमधील चालकासह तिघांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. हा अपघात बुधवारी रात्री ८ च्या सुमारास सांगोला – महूद रोडवरील वाकी शिवणे गावाजवळ घडला. दरम्यान, मृत व जखमींच्या नातेवाईकांनी टमटमधील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी रस्ता रोको केला.

शालन महादेव मेटकरी (वय ५३, रा. महाजन फाटा, महूद, ता. सांगोला) असे मृत महिला भाविकेचे नाव आहे. जखमींमध्ये महादेव सुखदेव मेटकरी (वय ६०), ऋतुजा दादासाहेब मेटकरी (वय ७, दोघेही रा. महाजन फाटा, महूद), गणपत धोंडिराम रुपनर (वय ६५), कल्पना गणपत रुपनर (वय ५५) व युतराज बिरु रुपनर (वय ११, रा. महूद येडगेवाडी नंबर २) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महूद महाजन फाटा व अकलूज रोड येडगेवाडी नंबर २ येथील मृत व जखमी दोन बैलगाड्यांतून रविवारी आरेवाडी या कवठेमहांकाळ येथील बिरोबा देवाच्या यात्रेसाठी गेले होते. दोन दिवस मुक्कामानंतर बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने बिरोबा देवाचे देवदर्शन करून मेटकरी व रुपनर कुटुंब दोन बैलगाड्यांतून सांगोला मार्गे महूद घराकडे परतीच्या प्रवासाला निघाले होते. वाटेत त्यांच्या दोन्ही बैलगाड्या एकामागून एक रोडच्या डाव्या बाजूने महूदच्या दिशेने जात असताना रात्री ८ च्या दरम्यान सांगोल्याकडून महूदकडे भरधाव जाणाऱ्या विनानंबरच्या टमटमने बैलगाड्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाला फाशीच!, चिमुकलीवर अत्याचार करुन संपवणाऱ्या भीमराव कांबळेला शिक्षा, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

Nagpur Accident News: थरारक ! रस्त्यांवर रेसिंगच्या नादात भरधाव कार थेट पोहेवाला शॉपमध्ये घुसली

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा

Kolhapur Accident News: इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी

सांगोला-महूद रोडवर हृदयद्रावक अपघात; अपघाताने हिरावला आक्रमक चेहरा