टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Pune Accident: पुण्यात भीषण दुर्घटना ! ट्रॅव्हलरला आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू

Follow Us:

Hinjawadi Fire Accident News: हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले.

पुणे: हिंजवडी फेज वनमध्ये आज सकाळी भीषण अपघात घडला. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १२ कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागली. या दुर्घटनेत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळी सुमारे ८ वाजता टेम्पो हिंजवडी फेज वनमध्ये जात असताना चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच चालक आणि समोरील कर्मचारी गाडीतून तातडीने बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता आला नाही, त्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेत इतर काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, टेम्पोच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली असावी. तसेच, गाडीच्या मागील दरवाज्याच्या यंत्रणेत काही दोष होता का, याचाही तपास सुरू आहे.

Accident News

हेही वाचा

Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर…

Vidhan Parishad Election 2026: 12-4-1…विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल, कुणाला किती जागा?

What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?

Ambenali Ghat Scorpio Accident: चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयानक दृश्य

आंबेनळी घाटातील अपघाताचं कारण आलं समोर, दिवसभर थकल्यानंतर रात्री… पोलिसांची मोठी अपडेट काय?

इराण आणि अमेरिका युद्धविराम करारात इस्त्रायलचा मिठाचा खडा, जगावर मोठं संकट..