सांगोला (प्रतिनिधी):- स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे आता अवघड झाले आहे. खासगी शाळांमध्ये मिळणार्या सुविधा यामुळे पालक वर्गात आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये पाठवण्याचा कल वाढला आहे.या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा टिकण्यासाठी आणि शाळा वाचविण्यासाठी सांगोला तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यात जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी कर माफ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
जवळा ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या पाल्यांच्या पालकांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतचा ठराव घेऊन येथील मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच श्री.सज्जन मागाडे यांनी घेतला आहे.

ग्रामपंचायतीने पाणी व घरपट्टी माफ केली तर ग्रामपंचायतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. तसेही शासनाकडून ग्रामपंचायतींना निधी कमी मिळत असून, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, कर्मचार्यांचे पगार, सामाजिक सेवा यांच्या खर्चाचा भार ग्रामपंचायतीवर आहे. अनेक ग्रामस्थ वर्षेनुवर्षे कर भरत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न घटले तर सेवा देताना आर्थिक संकटांचा सामना ग्रामपंचायतींना करावा लागत असताना देखील जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकाव्यात म्हणून जवळा ग्रामपंचायतीकडून मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच श्री.सज्जन मागाडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीकडून झेडपी शाळांत शिकणार्या पाल्यांच्या पालकांचे घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
संबंधित बातम्या
पहिली ते चौथीपर्यंत मराठी शाळा सुरळीत सुरू होती. त्यातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आल्या आहे. शाळेत विद्यार्थी मिळणेदेखील कठीण झाले असून,जिल्हा परिषदेची शाळा कायम सुरू राहावी, यासाठी जवळा ग्रामपंचायतीने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीनी सुध्दा असा आदर्श घ्यावा, असे मत मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी सरपंच सज्जन मागाडे, उपसरपंच नवाज खलिफा, मा.उपसरपंच बाबासाहेब इमडे, सोसायटीचे चेअरमन सुनिलआबा साळुंखे-पाटील, मा.सरपंच बाळासाहेब गावडे, ग्रा.प.सदस्य अनिल सुतार उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या धाडसी निर्णयाला आमचा पाठींबा
ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या धाडसी निर्णयाला आमचा पाठिंबा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. जवळे गावचा आदर्श सांगोला तालुक्यासह जिल्ह्याने घेऊन जिल्हा परिषद च्या सक्षम करण्यासाठी हातभार लावावा.
मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील




