टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

माणगंगा भ्रमणसेवा संस्थेच्यावतीने वृक्षारोपण व संवर्धन भव्य खुल्या स्पर्धा

On: May 30, 2025 11:10 AM
Follow Us:

सांगोला (प्रतिनिधी) – माणगंगा भ्रमणसेवा संस्थेच्यावतीने सांगोला तालुक्यातील माण नदीकाठावर वृक्षारोपण करुन वर्षभर त्या वृक्षांचे उत्कृष्ट संवर्धन करणार्‍या वैयक्तिक ,व्यक्ती ,संस्था ,ग्रामपंचायत, माध्यमिक शाळा ,महाविद्यालय यांच्यासाठी खुल्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

सांगोला तालुक्यातील माणगंगा नदी काठावर पर्यावरण पूरक विविध प्रकारची यामध्ये वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब, जांभळ, उंबर, करंज, देशी बाभळ, पळस यापैकी विविध प्रकारच्या दहा वृक्षांची लागवड करून वर्षभर उत्कृष्ट संवर्धन करणार्‍या स्पर्धकांची निवड करून त्यांना प्रथम क्रमांकसाठी रोख रु. 10 हजार, द्वितीय क्रमांकासाठी रोख रु. 7 हजार, तृतीय क्रमांकासाठी रोख रु. 3 हजार व प्रत्येक विजेत्यास सन्मान चिन्ह व गौरव पत्र मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी माणगंगा नदी पात्राचे तीन टप्पे केले असून प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यामध्ये पहिला टप्पा खवासपूर ते अनकढाळ, दुसरा टप्पा वाटंबरे ते आलेगाव-बेले मळा व तिसरा टप्पा वाढेगांव ते मेथवडे याप्रमाणे राहणार आहे.

माणनदीच्या काठावर वृक्ष लागवडीसाठी दोन फूट लांब, दोन फूट रुंद व दोन फूट खोल याप्रमाणे स्पर्धकांनी खड्डे काढावे. दोन खड्ड्यातील अंतर 7 मीटर ठेवावे. रोपे लागवडीची तयारी करून ज्या गावच्या ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपण करणार आहे, त्या ग्रामपंचायतीकडे दि. 30 जून 2025 पर्यंत प्रवेशपत्र भरून द्यावीत. ज्यांचे प्रवेश पत्र मुदतीत येईल अशा स्पर्धकांना संस्थेमार्फत विविध प्रकारची योग्य ती जास्तीत-जास्त 15 रोपे देण्यात येतील. परंतु स्पर्धेसाठी 10 रोपे गृहित धरली जातील.

पुरस्कारासाठी निवड करताना जीवंत रोपांची संख्या, रोपावरील टवटवी, रोपांची झालेली वाढ, वृक्ष लागवड परिसरातील स्वच्छता, वृक्ष लागवडीच्या ओळीतील व समोरच्या नदीपात्रातील उपद्रवी वनस्पतीचे निर्मूलन इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातील. अशी माहिती माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी दिली.

यासाठी तिन्ही टप्प्यात काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य घेतले जाईल. याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार सांगोला, उप.अभियंता पाटबंधारे अधिकारी पंढरपूर, वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, सामाजिक वनीकरण अधिकारी सांगोला, तालुका कृषी अधिकारी सांगोला, गटविकास अधिकारी सांगोला या सर्व कार्यालयांना माहितीसाठी कळविले असल्याचेही घोंगडे यांनी सांगितले.

हेही वाचा

ह.मंगेवाडी: अंघोळीला जाताना बांथरुम बाहेर काढुन ठेवलेले सोन्याचे दागिने पळविले चोरट्यांने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा