टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ह.मंगेवाडी: अंघोळीला जाताना बांथरुम बाहेर काढुन ठेवलेले सोन्याचे दागिने पळविले चोरट्यांने

On: May 30, 2025 11:08 AM
Follow Us:

सांगोला(प्रतिनिधी):- अंघोळीला जाताना बांथरुम बाहेर काढुन ठेवलेले सोन्याची मोहनमाळ व बोरमाळ अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली असल्याची घटना मौजे हटकर मंगेवाडी ता. सांगोला येथे दि. 27 मे 2025 रोजी सकाळी 4 वाजता ते 6 वाजणेच्या दरम्यान घडली. चोरीची फिर्याद खातुनबी पिरसाहेब शेख (वय 80 वर्षे धंदा घरकाम रा. हटकर मंगेवाडी ता. सांगोला) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.

चोरट्यांनी 75 हजार रुपये किंमतीची अंदाजे 3 तोळे वजनाची एक सोन्याची साखळीतील बारीक मण्याची मोहन माळ तसेच 25 हजार रुपये किंमतीची अंदाजे 1 तोळे वजनाची एक सोन्याची बोर माळ असे एकूण 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळवून नेले आहेत.

सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक 27 मे 2025 रोजी पहाटे 4 वाजणेच्या सुमारास खातुनबी शेख यांनी नेहमी प्रमाणे घराच्या बाहेरील बांधरुम मध्ये अंघोळीस जाण्याअगोदर गळ्यातील सोन्याची मोहनमाळ व बोरमाळ बांधरुमच्या बाहेर काढुन ठेवुन अंघोळीला गेल्या होत्या.अंघोळ करीत असताना घराचा मुख्य कंम्पाडचा आवाज आल्याने खातुनबी शेख या पटकन अंघोळ करुन कोण आहे पाहण्यासाठी बाहेर आल्या. परंतु तेव्हा कोणी नव्हते. अंघोळीला जाताना ठेवलेले सोन्याचे दागिणे ठेवलेल्या ठिकाणी मिळुन आले नाहीत. त्यानंतर संपुर्ण घरात, घराच्या आजुबाजुच्या परिसरात अंघोळीकरिता जाताना ठेवलेली सोन्याची मोहनमाळ व बोरमाळ यांचा शोध घेतला असता त्या वस्तु मिळुन न आल्याने खात्री झाली की सोन्याची मोहनमाळ व बोरमाळ कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वताच्या फायद्याकरिता चोरुन घेवुन गेले आहेत.

हेही वाचा

Ladki Bahin Yojana : आयत्या बिळावर नागोबा..2 हजारांपेक्षा जास्त महिला लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा