टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : युद्धाचं पुन्हा सावट, सराफा बाजारात मोठी उलथापालथ

Follow Us:

इराण-अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तणाव वाढला असून, याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर स्पष्ट दिसत आहे. दिल्ली, मुंबईसह प्रमुख भारतीय शहरांतील ताजे दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती जाणून घेऊया. आज 10 ग्रॅम सोनं..

Gold Price Today : युद्धाचं पुन्हा सावट, सराफा बाजारात मोठी उलथापालथ, थेट सोन्याचे भाव...

पाकिस्नाच्या इस्लामाबादमध्ये इराण-अमेरिकेत झालेली शांतात चर्चा निष्फळ ठरली असून आता जगावर पुन्हा युद्धाचं सावट घोंगावायला लागलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्य ट्रम्पनी होर्मुजच्या सामुद्रधुनीच्या नाकाबंदीचे आदेश दिले असून इराणविरोधात ते आक्रमक भूमिका लवकरच घेऊ शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या या घडामोडींचे सर्वच क्षेत्रात पडसाद उमटत असून आता सोन्या-चांदीच्या दरांवरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशात सोन्याची किंमत घसरलेली पहायला मिळाली आहे. सोमवार, 13 एप्रिल रोजी सकाळी राजाधनानी दिल्लीत 24 क2रेट सोन्याचे दर 1, 52, 980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत तर मुबीत हाच दर 1 , 52,830 रुपये आहे.आज जरी दर कोसळला असला तरी गेल्या आठवड्याभरात 24 कॅरेट सोनं हे 1910 रुपयांनी महागलं आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1750 रुपयांनी वाढल्याचं दिसून आलं. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस 4,777.17 डॉलर्स इतका आहे.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,52,980 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,40,240 रुपये इतका आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि कोलकाता येथे 24 कॅरेटचं 1 तोळे, म्हणजेच 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1लाख 52 हजार 830 रुपये आणि 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1 लाख 40 हजार 090 रुपये मोजावे लागणार आहेत.

चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 54 हजार 100 रुपये इतकी असूनन 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 1, 41, 260 रुपये मोजावे लागणार आहेत. पुणे आणि बंगळूरू या दोन्ही शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,52,830 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,40,090 रुपये आहे. एकूण पहायला गेलं तर देशात चेन्नईत सोनं सर्वाधिक महाग असल्याचं दिसून येत आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹)
दिल्ली 140240 152980
मुंबई 140090 152830
अहमदाबाद 140140 152880
चेन्नई 140990 153810
कोलकाता 140090 152830
हैदराबाद 140090 152830
जयपुर 140240 152980
भोपाल 140140 152880
लखनऊ 140240 152980
चंडीगढ़ 140240 152980

चांदीचे दर

सोन्याच्या भावात उलथापालथ झालेली असतानाच आज 13 एप्रिल रोजी चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही घट झाली आहे. आज सकाळी चांदी 1 किलोची किंमत ही 2,59,900 रुपयांपर्यंत घसरली आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत 10 हजार रुपयांची वाढ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस 75.91 आहे. या वर्षी जानेवारीमध्ये भारतात चांदीच्या किमतीने 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तेव्हा चांदी प्रचंड महागली होती. मात्र आता चांदीच्या दरात चढउतार कायम असून उच्चांकापेक्षा ती बरीच खाली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now