टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : सोमवारी सकाळीच गुड न्यूज ! सोन्याच्या दरात चांगलीच घसरण, जाणून घ्या आजचे भाव..

Gold-Silver Rate Today 30 March 2026 Latest News Updates in Marathi : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा फटाक संपूर्ण जगाला बसत असून सोनं-चांदीच्य किंमतीवरही त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपसून सतत कमी-जास्त होणाऱ्या सोनं-चांदीचे आजचे दर काय आहेत ? जाणून घ्या भाव

Gold Price Today :  सोमवारी सकाळीच गुड न्यूज ! सोन्याच्या दरात चांगलीच घसरण, जाणून घ्या आजचे भाव..

आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी, 30 मार्च रोजी सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाला पाचवा आठवडा सुरू झाल्याने बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. ब्लूमबर्गच्या मते, या दबावामुळे आज सोन्याचा भाव सुमारे 1.38 % ने घसरून 4462 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भाव 2% घसरून 68.3 डॉलर प्रति औंस पातळीवर पोहोचला. भारततही सोनं-चादींच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आली. आज, 30 मार्चच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,48,210 रुपयांपर्यंत घसरला. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 48,080 रुपये आहे. एका आठवड्यात 24 कॅरेट सोने 2100 रुपयांनी महाग झालं आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या भावात 1950 रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवार, 28 मार्च रोजी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 1900 रुपयांनी किंवा 1.3 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅमसाठी 1, 47,800 रुपयांवर आला होता.

देशातील काही महत्वाच्या शहरातील सोन्याचे दर

दिल्लीत सोन्याचा भाव : दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 48 हजार 210 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1, 35, 890 रुपये इतका आहे.

मुंबई आणि कलकत्ता : सध्या मुंबई, चेन्नई आणि कलकत्ता येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,35,740 रुपये प्रति 10 अशी आहे, तर 24 कॅरेट सोनं हे 1,48,080 रुपयांनी मिळत आहे.

चेन्नईमध्ये सोन्याची किंमत : 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,49,010, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,36,590 आहे.

पुणे आणि बंगळुरूमध्ये दर : या दोन शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,48,080 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,35, 740 रुपये आहे.

चांदीचे दर

सोन्याप्रमाणेच चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही घसरण होताना दिसत आहे. 30 मार्चच्या सकाळी, चांदीची किंमत प्रति किलोग्रामसाठी 2,44,900 रुपयांपर्यंत घसरली आहे. गेल्या आठवड्यात चढ-उतार पाहिल्यानंतर, चांदीची किंमत अखेर आठवड्याभरापूर्वीच्या पातळीवर स्थिरावली. शुक्रवारी, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत 11,250 रुपययांनी किंवा सुमारे 5 टक्क्यांनी घसरून प्रति किलोग्राम 2,30,000 रुपयांवर आली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस 68.3 डॉलर आहे. यावर्षी जानेवारीमध्ये चांदीच्या किमतीने 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

हे सुद्धा वाचा

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर…

Vidhan Parishad Election 2026: 12-4-1…विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल, कुणाला किती जागा?

What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?

Ambenali Ghat Scorpio Accident: चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयानक दृश्य

आंबेनळी घाटातील अपघाताचं कारण आलं समोर, दिवसभर थकल्यानंतर रात्री… पोलिसांची मोठी अपडेट काय?

इराण आणि अमेरिका युद्धविराम करारात इस्त्रायलचा मिठाचा खडा, जगावर मोठं संकट..