टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : उच्चांकापेक्षा सोनं हजारोंनी स्वस्त, आठवड्याच्या नव्या दिवशी 1 तोळा सोन्याचे भाव काय ?

Gold Price Today 27 July 2026 Latest News Updates in Marathi : जानेवारीत सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला होता. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव वऱ-खाली होत असून 27 जुलै रोजी देशातूल काही प्रमुख शहरांत 1 तोळा सोन्याचे दर किती झालेत ते जाणून घेऊया.

Gold Price Today : उच्चांकापेक्षा सोनं हजारोंनी स्वस्त, आठवड्याच्या नव्या दिवशी 1 तोळा सोन्याचे भाव काय ?

देशात सोन्याच्या किमतीत घसरणीचा कल कायम आहे. बहुतेक शहरांमध्ये सोन्याचे दर आणखी कमी झाले आहेत. 27 जुलैच्या सकाळी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 1,45,070 रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) झाला आहे. गेल्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 1,800 पर्यंत वाढ झाली होती. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,650 रुपयांपर्यंत वाढला होता. मात्र, देशांतर्गत बाजारात खरेदीचा उत्साह कमी असल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर 4,052.78 डॉलर प्रति औंस इतका आहे. जागतिक तणाव, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे कठोर मौद्रिक धोरण आणि महागाईबाबतच्या चिंतांमुळे सोन्याच्या किमतींवर दबाव कायम आहे. जानेवारी 2026 मध्ये सोन्याच्या किमतींनी प्रति औंस 5602 डॉलर्सची उच्चांकी पातळी गाठली होती; मात्र, त्यानंतर त्यात सुमारे 28 टक्क्यांची घसरण झाली आहे. अलीकडच्या काळात दोनदा या किमती प्रति औंस 4000 डॉलर्सच्या खाली गेल्या होत्या आणि सध्या त्या 4052 डॉलर्सच्या आसपास व्यवहार सुरू आहेत.

उच्चांकापेक्षा सोनं स्वस्त

जानेवारी महिन्यात भारतात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.80 लाख रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. मात्र, आता हा भाव 1 लाख 45 हजार लाख रुपयांपर्यंत खाली आला आहे—म्हणजेच उच्चांकावरून त्यात सुमारे 35 हजारांची घट झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे भाव सातत्याने कमी होत आहेत. त्यामुळे, गुंतवणूकदारांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, ही घसरण खरेदीची संधी आहे की सोन्याचे भाव आणखी खाली येऊ शकतात.

देशातील काही महत्वाच्या शहरातील सोन्याचे दर

दिल्ली:

24 कॅरेट सोने: 1,45,070 रुपये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने: 1,32,990 रुपये प्रति 10 ग्रॅम

मुंबई आणि कोलकाता:

22 कॅरेट सोने: 1,32,840 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने: 1,44,920 रुपये प्रति 10 ग्रॅम

चेन्नई:

24 कॅरेट सोने: 1,45,080 रुपये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने: 1,32,990 रुपये प्रति 10 ग्रॅम

पुणे आणि बंगळुरू:

24 कॅरेट सोने: 1,44,920 रुपये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने: 1,32,840 रुपये प्रति 10 ग्रॅम

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 132990 145070
मुंबई 132840 144920
अहमदाबाद 132890 144970
चेन्नई 132990 145080
कोलकाता 132840 144920
हैदराबाद 132840 144920
जयपुर 132990 145070
भोपाळ 132890 144970
लखनऊ 132990 145070
चंदीगड 132990 145070

चांदीचे दर

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदीनेही गुड न्यूज दिली आहे, चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. 27 जुलैच्या सकाळी चांदीचा दर 2,39,900 रुपये प्रति किलो इतका आहे. गेल्या एका आठवड्यात चांदीच्या भावात 10 हजारांची वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा दर 58.11 डॉलर प्रति औंस इतका आहे. देशांतर्गत बाजारातील सोने आणि चांदीचे दर हे केवळ देशांतर्गत मागणी-पुरवठ्यावरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरचा विनिमय दर आणि इतर जागतिक आर्थिक घटकांवरही अवलंबून असतात.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now