टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : सोनं उच्चांकापेक्षा स्वस्त, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरले भाव, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today 6 April 2026 in Matahi : सोनं-चांदीचे दर सतत वरखाली होताना दिसत आहेत. मात्र गेल्या काही काळाच्या तुलनेत दोन्ही धातूंचे भाव खूपच घसरले आहेत. या महिन्याच्या सुरूवातील चांदीची किंमत 4 लाखांच्या पार गेली होती. आज, 6 एप्रिल रोजी सोन-चांदीचे भाव किती ?

Gold Price Today : सोनं उच्चांकापेक्षा स्वस्त, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरले भाव, जाणून घ्या आजचे दर

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. तीन दिवसांच्या बंदनंतर बाजार आज उघडत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशभरात सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. उच्चांकापेक्षा सोनं खूप स्वस्त झालं आहे. सोमवार, 6 एप्रिलच्या सकाळी राजधानी दिल्लीमधये 24 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 51हजार 070 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत. तर मुंबईत हाच दर 1 लाख 50 हजार 920 रुपये इतका आहे. एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 2860 रुपयांनी महागले आहेत. तर दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचा भाव 2600 रुपयांनी चढलाय. गेल्या आठवड्यात, शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत फार चढउतार झाले नव्हते. मात्र सोन्याच्या उच्चांकाच्या तुलनेत आजचे सोन्याचे दर स्वस्त असल्याचं दिसतंय.

मात्र हे लक्षात घेण्यासारखं आहे की, 29 जानेवारी रोजी सोन्याच्या किमतीने प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 80 हजार 779 रुपये हा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मात्र आतात उच्चांकापेक्षा सोन खूप स्वस्त झालं असून गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघांचंही सोन्याच्या दरांवर बारकाईने लक्ष असतं. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव सध्या प्रति औंस 4,591.52 डॉलर इतका आहे. देशांतर्गत सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडतो.

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,51,070 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचे दर 1,38,490 इतके आहेत. तसेच मुंबई आणि कलकत्ता येथे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 1,38,340 रुपये मोजावे लागत असून 24 कॅरेटचे दर हे 1,50,920 रुपये प्रति 10लग्रॅम इतके आहेत. दुसरीकडे चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोनं 1,52,170 रुपये तर 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 1,39,490 रुपये मोजावे लागतील. पुणे आणि बंगळुरू या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोनं 1,40,920 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोनं हे 1,38,340 रुपयांना मिळतंय.

 शहर  22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹)   24 कॅरेट सोन्याचा आजचा दर ₹)
दिल्ली 138490 151070
मुंबई 138340 150920
अहमदाबाद 138390 150970
चेन्नई 138340 150920
कलकत्ता 138340 150920
हैदराबाद 138340 150920
जयपुर 138490 151070
भोपाळ 138390 150970
लखनऊ 138490 151070
चंदीगड 138490 151070

 

भारतात चांदीची किंमत किती ?

सोन्याप्रमाणेच आता भारतात चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण सुरूच आहे. सोमवारी, 6 एप्रिलच्या सकाळी, चांदीचा भाव प्रति किलोग्रामसाठी 2, 49, 900 रुपये इतका होता. एका आठवड्यात चांदी ही 5 हजार रुपयांनी महाग झाली आहे. शुक्रवारी, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव प्रति किलोग्राम 2, 37,000 रुपयांवर स्थिर राहिला. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव प्रति औंस 69.57 डॉलर आहे. यावर्षी जानेवारीमध्ये चांदीच्या भावाने 4 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र आता चांदी ही देखील उच्चांकापेक्षा स्वस्त असलेली पहायला मिळत आहे. युद्ध पेटलेलं असतानाही सोन-चांदीचे दर घसरताना दिसत आहेत. युद्ध अधिक भडकलं तर सोन्या-चांदीच्या दरात घसरण होऊ शकते, मात्र काही आठवड्यात युद्धबंदीची घोषणा झाल्यास सोन-चांदीचे दर पुन्हा वर जाऊ शकतात.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर…

Vidhan Parishad Election 2026: 12-4-1…विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल, कुणाला किती जागा?

What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?

Ambenali Ghat Scorpio Accident: चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयानक दृश्य

आंबेनळी घाटातील अपघाताचं कारण आलं समोर, दिवसभर थकल्यानंतर रात्री… पोलिसांची मोठी अपडेट काय?

इराण आणि अमेरिका युद्धविराम करारात इस्त्रायलचा मिठाचा खडा, जगावर मोठं संकट..