Sangola Breaking News; महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, सांगोला तालुक्यातील घडामोडी पाहा एका क्लिकवर, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडे्स, सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी शारदादेवी करमाफी अभियान योजना राज्यात आणि जिल्ह्यात राबवावी म्हणून दिपकआबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेणार ; सरपंच सज्जन मागाडे
सांगोला (प्रतिनिधी):-सध्या सर्वत्र खासगी शाळांचे पेव फुटल्याने पट संख्येच्या अभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. गोर गरिबांच्या मुलांना शिक्षणाचे धडे देणार्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत. यासाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शारदादेवी करमाफी अभियान संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात राबवावे या मागणीसाठी आपण लवकरच सरपंचाचे शिष्टमंडळ घेऊन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सक्षम आणि कर्तव्यनिष्ठ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेणार असल्याचे माहिती माहिती जवळा ग्रामपंचायतीचे सरपंच सज्जन मागाडे यांनी दिली.
जवळा ता सांगोला या आध्यात्मिक नगरीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला घरपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. सोशल मीडियावर आणि संपूर्ण राज्यात या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. म्हणून हाच निर्णय संपूर्ण राज्यासाठी घेण्यात यावा यासाठी काही निधीची गरज लागली तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या निधीची तरतूद करून बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद शाळांना जीवनदान द्यावे.
सध्या सर्वत्र शिक्षणाचे व्यावसायिकरण झाल्याने खासगी शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी भरमसाठ फी मोजावी लागत आहे. ग्रामीण भागातील हातावर पोट असणार्या गोरगरीब जनतेला असे शिक्षण परवडत नसल्याने त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळा हा एकमेव पर्याय शिल्लक आहे.
खासगी शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत जर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या तर गरिबांच्या मुलांना शिक्षणाचे धडे गिरवता येत येणार नाहीत. म्हणूनच विकासाची दूरदृष्टी असणार्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि गेल्या 100 दिवसांत आपल्या कामाचा ठसा उमटवून ग्रामविकास खात्याला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे कर्तबगार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे या विषयाकडे लक्ष वेधून जिल्हा परिषद शाळांत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला घरपट्टी पाणीपट्टी आणि सर्व स्थानिक कर माफ करावे ही मागणी घेऊन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंचाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेणार असल्याचे शेवटी सरपंच सज्जन मागाडे यांनी स्पष्ट केले.
आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांने राजेवाडी तलावातून पाणी सोडण्यास सुरुवात
सांगोला (प्रतिनिधी): शेरेवाडी तलाव लाभधारक शेतकरी व खवासपुर येथील शेतकर्यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांना राजेवाडी तलावातुन शेरेवाडी तलाव व खवासपुर, उ़ंबरगावला जाणार फाटा क्रमांक 21 ला पाणी सोडण्याची मागणी गेल्या दोनच दिवसांपुर्वी केली होती.
शेतकर्यांच्या मागणीचा विचार करुन आमदार बाबासाहेब देशमुख यांनी फलटणचे मा.जाधव साहेब यांना संपर्क केला व में महिन्यातच राजेवाडी तलाव भरुन पाणी सांडीवरुन वाहुन नदीला जात आहे.. परंतु तेच पाणी खवासपुर, उंबरगाव, कटफळ, जाधववाडी, चिकमहुद, नरळेवाडी, व महुदचा काही भाग, व वाकी या लाभधारक गावांना देण्याची मागणी केली. व जर राजेवाडी तलावातील सांडीवरुन वाहुन पाणी नदीला जात असेल व काही गावांना पाणीच मिळत नसेल तर हेच पाणी लाभधारक शेतकर्यांना देता येते ही बाब आमदार बाबासाहेब देशमुख यांनी फलटणच्या अधिकार्यांना सांगीतली व या शेतकर्यांवरती आंन्याय होत असल्याची बाब अधिकार्यांना बोलुन दाखवली. आमदार साहेबांच्या या मागणीला अधिखार्यांनी सकारात्मकता दाखवली ..
सोमवारी संबंंधीत अधिकार्यांनी खवासपुर व उबरगावला जाणारा फाटा क्र 21 व शेरेवाडी तलावात पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने लाभधारक शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी पाणी सोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांने शेतकरी वर्ग खुष झाला असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.
कोळेकर महास्वामींचा प्रथम स्मृतिदिन सांगोला शहरात संपन्न
सांगोला (प्रतिनिधी):- श्री 108 ष ब्र लिंगैक्य गुरुमुर्ती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामींजी 30 वे पिठाधिपती यांचा प्रथम स्मृतिदिन सोहळा श्री गुरुसिद्दमल्लया मठ संस्थान सांगोला येथे संपन्न झाला.
श्री गुरुसिद्दमल्लया यांच्या संजिवनी समाधीचे विधीवत पुजन सौ उज्वला व श्री संजय कोठावळे यानी केले. नंतर कोळेकर महास्वामीजीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. उपस्थीत शिवभक्तांनी शिवनामाचा गजर करीत प्रतिमेवर पुष्पवृष्टी केली.
यावेळी लिंगायत समाजातील महीलांनी भजनाचा कार्यक्रम केला. श्री.भारत ढोले व उज्वला कोठावळे यांनी कोळेकर महास्वामीं यांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे पोराहित्य हर्षल स्वामी यानी केले. उपस्थीत शिवभक्तांना प्रसादाचा लाभ झाला.
सांगोला तालुका कविसंमेलनामध्ये कवी,कवयित्रींचा सन्मान
सांगोला (प्रतिनिधी):-माणदेशात अनेक दर्जेदार साहित्याची परंपरा आहे. कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन अशा विविध साहित्य प्रकारात माणदेशातील साहित्यिक आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. यानुसार कवी, कवयित्री यांचे सादरीकरण,नवोदितांना प्रोत्साहन व कवी, कवयित्री यांचा सन्मान या हेतूने महाराष्ट्र साहित्य परिषद, नगर वाचन मंदिर,लायन्स क्लब, रोटरी क्लब व अर्बन बँक सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित अर्बन बँक सांगोला येथील सभागृहामध्ये संपन्न झालेल्या सांगोला तालुका कवी संमेलनामध्ये तीस कवी कवयित्रींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रं.ता.चोरमुले, प्रमुख पाहुणे डॉ.अविनाश सांगोलेकर,म.सा.प.,नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संस्थापक चेअरमन डॉ.प्रभाकर माळी, म.सा.प.कार्याध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कृष्णा इंगोले, लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष विकास देशपांडे, म.सा.प. प्रमुख कार्यवाह व सांगोला तालुका कविसंमेलन समन्वयक प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते.
या कविसंमेलनामध्ये शिवाजी बंडगर, राधिका प्रेमसंस्कार, तानाजी वाघमारे, साबळे गुरुजी, ना.मा.कांबळे, अॅड उदय दौंडे, निलिमा कुलकर्णी, पुष्पलता मिसाळ, सुशिला नांगरे-पाटील, योजना मोहिते, मनीषा ठोंबरे, हर्षदा गुळमिरे, सुवर्णा तेली, गौसपाक मुलाणी, गीता गुळमिरे, आश्लेषा मोदी, सुप्रिया कांबळे, जान्हवी सावंत, सीमा गायकवाड, सुरेखा कुलकर्णी, जयश्री पाटील, प्रज्ञा देशपांडे, विद्या शिर्के, बशीर तांबोळी, वंदना पाटणे, श्रद्धा गुळमिरे, श्वेता कारंडे, संगिता केसकर व खुमारदार शैलीत कवी सुनील जवंजाळ यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच या कवी संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा इंगोले व कवी आनंद लोकरे यांनी कविता सादरीकरण केले. यावेळी कवी संमेलनामध्ये डॉ.प्रभाकर माळी, प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, डॉ.अविनाश सांगोलेकर, रं.ता.चोरमुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पंढरीचा परिवार’ यूट्यूब चॅनलचे संतोष कसगावडे व श्री.क्रिएशनचे श्रीकांत बंडगर यांचा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक स्वागत कविसंमेलन समन्वयक प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले. शेवटी लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कवी संमेलनासाठी पदाधिकारी, सदस्य, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट घटक 2.0 अंतर्गत उत्पादन पध्दतीच्या वैयक्तिक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा
सांगोला (प्रतिनिधी):- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पाणलोट घटक 2.0) अंतर्गत सांगोला तालुक्यातील हातीद, हटकर मंगेवाडी. जुजारपुर, निजामपुर, व कडलास (पाणलोट क्षेत्रातील) या गावातील शेतकर्यांना उत्पादन पध्दतीच्या वैयक्तिक लाभार्थ्यांना विविध घटकांसाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक – 10/06/2025 आहे. अर्ज सदस्य पाणलोट समिती ग्रामपंचायत कार्यालय येथे सादर करावेत. सदर योजने अंतर्गत एका कुटुंबातील एकाच सदस्यास अर्ज करता येईल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर सदर अर्जाची छाननी करुन योग्य अर्जाची निवड केलेल्या लाभाथीची सोडत पध्दतीने ग्रामपंचायत स्तरावर सोडत घेऊन पात्र लाभार्थाना पूर्व समंती देण्यात येईल. दिनांक -10/06/2025 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. योजनेतील समाविष्ठ घटकासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित गावातील पाणलोट समिती व ग्रामस्तरीय कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी केले आहे.
अनुसुचित जाती/जमाती मधील लाभ धारकांनी अर्ज करताना सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेला जातीचा दाखला अर्जासोबत जोडावा, असे आवाहनही त्यांनी केले.
विद्यामंदिर हायस्कूल एखतपुर मध्ये 2002-2003 च्या बॅचचा गेट-टुगेदर संपन्न
एखतपूर (वार्ताहर):- विद्यामंदिर हायस्कूल एखतपुर मध्ये 2002-2003 च्या बॅचचा गेट-टुगेदर रविवार 1 जून रोजी संपन्न झाला. प्रास्ताविक वैशाली घाडगे व प्रवीण नवले यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष कृषी भूषण प्रभाकर काका चांदणे यांचे स्वागत आणि सत्कार अविनाश नवले या विद्यार्थ्यांनी केले.
यावेळी प्रशालेचे माजी मुख्याध्यापक येलपले सर, डोंबे सर, मेटकरी सर, चव्हाण सर प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक माने सर तसेच जितेश कोळी सर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोसे यांचे स्वागत केले. बर्याच विद्यार्थ्यांनी विविध आठवणींना उजाळा दिला.
प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रवीण नवले म्हणाले की, आमच्या 2002-2003 बॅच मध्ये सर्व विद्यार्थी निर्व्यसनी आहेत. शाळेने आम्हाला शिक्षणासोबत चांगले संस्कारही दिले. त्यामुळेच आम्ही चांगले घडलो. यावेळी सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषिभूषण प्रभाकर काका चांदणे यांनी विद्यार्थ्यांचे असे गेट-टुगेदर वारंवार व्हावे म्हणजे शाळेशी नाळ जोडून राहील.
या कार्यक्रमासाठी संदीप सरगर, विजय नवले, विकास इंगोले, विठ्ठल सुज्ञे, दत्तात्रय नवले, शंकर इंगोले, धनाजी मोरे, दत्तात्रय फाळके, सतीश घारगे, मंजुनाथ सुज्ञे, नवनाथ जाधव, सोमनाथ नवले, स्वाती दबडे, नीता गुरव, मनीषा माळी, राणी कदम, मनीषा घाडगे, विद्या नागणे, अनुराधा कांबळे, सविता पवार आणि रूपाली जाधव उपस्थित होत्या.
शेवटी श्री.सुहास कोळी, श्री.दादा इंगोले श्री.संदीप सरगर व श्री.विजय नवले यांनी आभार मानले.
वीरभद्र मंदिर नाझरे येथे कोळेकर महास्वामी यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
नाझरा (वार्ताहर):- श्री गुरुमूर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी तिसावे पिठाधिपती यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचे विरभद्र मंदिर नाझरे ता.सांगोला येथे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महास्वामीच्या प्रतिमेचे पूजन रविराज शेटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी वीरशैव महिला भजनी मंडळाचे भजन तसेच महा आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आला. सदर प्रसंगी अशोक पाटील गुरुजी, रविराज स्वामी, संजय रायचुरे, शरद स्वामी, रमेश शिरदाळे, बाळासो स्वामी, दीपक शिरदाळे, शंकर स्वामी,महालिंग पाटील, मुकुंद पाटील, दिलीप शिरदाळे, आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके, पंचाक्षरी स्वामी, शिवया स्वामी, शिवाजी स्वामी, महिलावर्ग, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. पुरोहित म्हणून रविराज स्वामी यांनी काम पाहिले.
आणखी वाचा
आमदार बाबासाहेब देशमुख यांची राज्याच्या धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समिती संचालक पदी निवड