टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून सांगोला तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर

गौडवाडी, बुद्धेहाळ, राजुरी, नाझरे आणि नराळे ग्रामपंचायतींना नविन इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर

सांगोला: ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती. सांगोला विधानसभा मतदारसंघातील गौडवाडी, बुद्धेहाळ, राजुरी, नाझरे आणि नराळे या पाच ग्रामपंचायतींना मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत नविन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश मिळाले आहे.

ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकार्यांना गावचा कारभार पाहताना येणार्‍या अडचणी दूर व्हाव्या, यासाठी मतदार संघातील 5 ग्रामपंचायत कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी मिळवून दिला आहे.
मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाला गती देवून, शासकीय कार्यालयांचा देखील विकास करण्यावर आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भर दिला आहे. यामुळे प्रशासकीय अधिकार्‍यांची मोठी अडचण दूर होवून, नागरिकांना सेवा मिळण्याची सुविधा निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या कडे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी अधिवेशनापूर्वी केली होती. या मागणीची दखल घेत ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांनी तत्काळ या ग्रामपंचायतींना मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गतनिधी मंजूर केला असून निधी मंजूर केल्याबद्दल आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.

ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतींना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यासह ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आभार मानले.

 

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Horoscope Today 27th July 2026 : आजचा दिवस खास, या दोन राशींसाठी उघडणार प्रगतीचे दरवाजे, वाचा तुमचं भविष्य !

Gold Price Today : उच्चांकापेक्षा सोनं हजारोंनी स्वस्त, आठवड्याच्या नव्या दिवशी 1 तोळा सोन्याचे भाव काय ?

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची तडकाफडकी मोठी घोषणा, संपूर्ण जगाला आता…भारतासाठीही खुशखबर!

अंध भक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले, झुरळाने हुकमूशहाला नमवलं, उद्धव ठाकरे

धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, ‘कॉकरोच’ला सरकार घाबरलं; विद्यार्थ्यांचा प्रचंड विजय!

Todays Horoscope : आजचे राशिभविष्य 24 जुलै 2026 : शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला,इच्छापूर्ती होणार ! पहा तुमचे राशिभविष्य काय सांगते ?