टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Digvesh Rathi Suspended : दिग्वेश राठीला अभिषेक शर्मासोबतचं भांडण भोवलं, आयपीएलची मोठी कारवाई, थेट निलंबन

On: May 20, 2025 12:24 PM
Follow Us:

Digvesh Rathi Suspended : लखनौ सुपर जायंटसचा फिरकीपटू दिग्वेश राठी याला गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

Digvesh Rathi लखनौ : लखनौ सुपर जायंटस आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील मॅचमध्ये जोरदार राडा झाला होता. लखनौचा फिरकीपटू दिग्वेश राठी आणि हैदराबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा एकमेकांना भिडले. अभिषेक शर्मानं 20 बॉलमध्ये 59 धावांची आक्रमक खेळी केली होती. 8 व्या ओव्हरमध्ये दिग्वेश राठीला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.यानंतर दिग्वेश राठीनं अभिषेक शर्माच्या दिशेनं धाव जात सही करत असल्याचा इशारा केला. यावरुन दोघांमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकरणावरुन आयपीएलकडून दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.दिग्वेश राठीला गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधून निलंबित करण्यात आलं आहे. अभिषेक शर्मावर देखील कारवाई करण्यात आली आहे.

दिग्वेश राठीचं निलंबन

दिग्वेश राठीला अभिषेक शर्मासोबतच्या वादामुळं गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅचमधून निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय त्याच्या मॅच फी पैकी  50 टक्के दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. याशिवाय सध्या त्याच्या नावावर 5 डिमेरीट पॉईंट असल्यानं त्याचं गुजरात टायटन्सचं निलंबन करण्यात आलं. अभिषेक शर्मावर देखील या वादामुळं कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या मॅच फी पैकी 25 टक्के रक्कम कापली जाणार आहे. दिग्वेश राठीवर यापूर्वी देखील आयपीएलकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्याला केवळ आर्थिक दंड आकारण्यात आला होता.

राजीव शुक्ला यांची मध्यस्थी

अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी या दोघांचा वाद मैदानावर पंचांनी सोडवला होता. मॅच संपल्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दोघांमध्ये मध्यस्थी केली. अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी भांडण मिटल्यानंतर मैदानावर सोबत फिरत होते.

हेदेखील वाचा

Chhagan Bhujbal Oath Ceremony : मी शपथ घेतो की…; अखेर छगन भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now