टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

1198 रुपयांचा BSNL चा 365 दिवसांचा रिचार्ज प्लॅन, फायदे जाणून घ्या

Follow Us:

तुम्ही BSNL चे युजर्स आहात का? असं असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण, आज आम्ही तुमच्यासाठी BSNL चा ‘पैसे वसूल’ प्लॅन घेऊन आलो आहोत. तुम्हाला आता वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही. 1200 रुपयांपेक्षा कमी किमतीत BSNL चा 365 दिवसांचा प्लॅन घ्या आणि वर्षभर टेन्शन फ्री राहा. चला तर मग या प्लॅनविषयी जाणून घेऊया.

तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याचे टेन्शन येत आहे का? असं असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी एक खास प्लॅन आणला आहे. तुम्हाला 365 दिवसांचा प्लॅन फक्त आणि फक्त 1200 रुपयांपेक्षा देखील कमी किमतीत मिळत आहे. हो. आम्ही सत्य बोलत असून हा प्लॅन BSNL चा आहे. चला तर मग या BSNL च्या 365 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

तुम्ही BSNL चे युजर्स असाल किंवा तुमचा नंबर स्वस्तात वर्षभर अ‍ॅक्टिव्ह ठेवू इच्छित असाल तर तुम्ही तुमचा नंबर BSNL वर पोर्ट करून या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. हो. विशेष म्हणजे तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याची देखील गरज नाही. एकदा रिचार्ज केले की वर्षभर नो टेन्शन. चला तर मग BSNL च्या 1198 रुपयांच्या प्लॅनविषयी पुढे जाणून घेऊया.

BSNL च्या 1198 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे कोणते?

BSNL चा 1198 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे, जो 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. BSNL चा दुसरे सिम म्हणून वापर करणाऱ्या युजर्ससाठी हा प्लॅन खास आहे.

या BSNL च्या 1198 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसोबत युजर्सचा मासिक खर्च जवळपास 100 रुपये आहे. BSNL च्या या प्लॅनमध्ये युजर्संना दर महिन्याला कोणत्याही नेटवर्कवर 300 फ्री कॉलिंग मिनिट्स मिळतात, जे संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. तसेच यात दर महिन्याला 3GB/4GB आणि दरमहा 30 फ्री SMS मिळतात. या प्लॅनमध्ये फ्री नॅशनल रोमिंगचाही समावेश आहे.
कॉलिंगची फ्री मिनिट संपल्यानंतर ग्राहकांना लोकल कॉलसाठी 1 रुपये प्रति मिनिट आणि STD कॉलसाठी 1.3 रुपये प्रति मिनिट या दराने शुल्क आकारले जाणार आहे. त्याचप्रमाणे लोकल SMS साठी 80 पैसे आणि नॅशनल SMS साठी 1.20 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

BSNL च्या 1199 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचे फायदे कोणते?

BSNL चा 1199 रुपयांचा प्लॅन आहे, ज्याची वैधता सुमारे 336 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग बेनिफिट्स मिळतात. डेटाबद्दल बोलायचं झालं तर BSNL च्या 1199 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 24GB डेटा मिळतो. तसेच प्लॅनमध्ये रोज 100 SMS मिळतात.

आम्ही तुम्हाला BSNL च्या 1199 आणि 1198 या दोन्ही रिचार्ज प्लॅनची माहिती सांगितली आहे. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे प्लॅन घेऊ शकतात.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now