Breaking News दिवाळीच्या काळात शांत असलेले राजकीय फटाके दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात फुटणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात १७ नोव्हेंबर रोजी एकाच व्यासपीठावर असणार आहेत. संजय घोडावत विद्यापीठात होत असलेल्या मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनासाठी दोन्ही नेते एकत्र येत आहेत.
विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी रान उठवणारे मनोज जरांगे पाटीलही त्याच दिवशी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. राज्य मुख्याध्यापक संघाचे वार्षिक अधिवेशन घोडावत विद्यापीठात १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या अधिवेशनसाठी पवार आणि फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या दोन्ही नेत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे कळवले आहे.