Saturday, September 21, 2024
HomeentertainmentBig ब्रेकिंग! तासभर चौकशी आणि सात लाखांचा दंड; शाहरुख खानला मोठा दणका

Big ब्रेकिंग! तासभर चौकशी आणि सात लाखांचा दंड; शाहरुख खानला मोठा दणका

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर जवळपास तासभर चौकशी करण्यात आली. शाहरुख खान त्याच्या टीमसह मुंबई विमानतळावर पोहोचला, यावेळी कस्टम विभागाने शाहरूख खानसह त्याच्या टीमला चौकशीसाठी थांबवले. 1 तासांच्या चौकशीनंतर कस्टम विभागाने शाहरूख आणि पूजा विमानतळावरून निघून गेले. मात्र कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याचा बॉडीगार्ड रवि आणि टीमला थांबून ठेवले.
खान शुक्रवारी म्हणजे 11 नोव्हेंबर रोजी दुबईहून मुंबईत परतत होता. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये आयोजित शारजा बुक फेअर कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अभिनेता त्याच्या प्रायव्हेट चार्टर VTR- SG विमानाने मुंबईला पोहोचला. रात्री 12.30 च्या सुमारास विमानतळावरील T3 टर्मिनलवर दाखल झाला. यावेळी शाहरूख खानच्या सामानात सुमारे 18 लाख रुपयांची महागडी घड्याळे सापडली. तसेच घड्याळांचे काही रिकामी बॉक्स देखील सापडले. यावेळी कस्टम विभागान या घड्याळांची चौकशी केली असता, ही घड्याळे भारतात आणण्यासाठी अभिनेत्याने कोणतेही कस्टम ड्युटी भरली नसल्याचे आढळून आले. यानंतर शाहरुख आणि त्याच्या संपूर्ण टीमला विमानतळावर थांबवण्यात आलं.
यावेळी कस्टम अधिकार्‍यांनी त्यांची चौकशी केली आणि सुमारे एक तासानंतर शाहरूख आणि त्यांची सेक्रेटरी पूजा ददलानीला सोडून दिले, मात्र कस्टम विभागाने पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अभिनेत्याचा बॉडीगार्ड रवी आणि इतर टीमला विमानतळावर थांबवले. घड्याळांच्या किंमतीचा अंदाज घेतल्यानंतर शाहरूखचा बॉडीगार्ड रवीने अभिनेत्याच्या क्रेडिट कार्डद्वारे 6,83,000 रुपये कस्टम ड्युटी भरली, त्यानंतर त्याच्या टीमला सोडून देण्यात आले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments