आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने ३३० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने शहर व तालुक्यातील ३३० विद्यार्थ्यांना १०६८ वह्या, स्क्वायर व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी दिली.

सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन १८ मे रोजी करण्यात आले. त्यावेळी बुके, पुष्पहार व इतर भेटवस्तू न देता शालेय साहित्य भेट देण्याचे आवाहन संस्थेने केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. स्क्वायर, वह्या, कंपास पेटी, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य, त्याचबरोबर अनेकांनी या शैक्षणिक साहित्यासाठी रोख रक्कमही देणगी म्हणून दिली होती.

शहरातील तसेच तालुक्यातील १० शाळांमधील ३३० गरजू विद्यार्थ्यांना जमा झालेले साहित्य व देणगीतून शालेय साहित्य खरेदी करून हे वाटप करण्यात आले.जि. प. प्राथमिक शाळा नाझरे, विद्यामंदिर प्रशाला नाझरे, श्री. दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी, जि. प. प्राथमिक शाळा चांडोलेवाडी, जि. प. प्राथमिक शाळा सांगोलकर वस्ती तरंगेवाडी, दे. कै.संभाजीराव शेंडे विद्यालय व ज्यु. कॉलेज मेडशिंगी, छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी, कै. सौ. वत्सलादेवी देशमुख विद्यालय जवळे, निवासी आश्रमशाळा, राजापूर व जि. प. प्राथमिक शाळा नं. ३, सांगोला या १० शाळामधील गरजू ३३० विद्यार्थ्यांना हे शालेय साहित्य वाटप करण्यात आल्याचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी सांगितले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon