टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Air Force Plane Crash : भारतीय हवाई दलाचं विमान आसाममध्ये कोसळलं, जोरहाटमध्ये 5 जवानांना वीरमरण, को-पायलट बचावला, उपचार सुरु

Air Force Plane Crash : आसामच्या जोरहाटमध्ये भारतीय हवाई दलाच्या एअर स्टेशनवर विमान क्रॅश झालं, या विमान अपघातात 5 जवानांना वीरमरण आलं. तर, एक जण अपघातातून बचावला आहे.

गुवाहाटी : आसामच्या जोरहाट एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाला. एअरबेसवर लँडिंग करत असताना हवाई दलाचं AN-32 कार्गो विमान क्रॅश झालं. या घटनेत विमानाचे दोन तुकडे आहेत. या दुर्घटनेत भारतीय हवाई दलाच्या 5 जवानांना वीरमरण आलं. या घटनेत या विमानातील को पायलट बचावले आहेत मात्र त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भारतीय हवाई दलाकडून तातडीनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

भारतीय हवाई दलाच्या 5 जवानांना वीरमरण

स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंह
फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार
सार्जेंट जितेंद्र शर्मा
अग्निवीर वायू खेमाराम कुमावत
अग्निवीर वायू दानिश आलम

भारतीय हवाई दलानं प्रसिद्धीस दिलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात या दुर्घटनेत वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दु:खाच्या प्रसंगात भारतीय हवाई दल तुमच्या कुटुंबासोबत उभ असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

भारतीय हवाई दलानं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी सुरु केली आहे. ही दुर्घटना कोणत्या कारणामुळं झाली याची चौकशी करण्यात येईल. जोरहाट एअरबेस जवळ विमान कशामुळं क्रॅश झालं. तांत्रिक समस्या निर्माण झाली की इंजिन फेल झालं याची चौकशी केली जाईल. याशिवाय खराब हवामानामुळं हा अपघात घडला असावा का या बाजूनं देखील चौकशी केली जाईल. भारतीय हवाई दलानं कोर्ट ऑफ इनक्वायरीचे आदेश दिले आहेत. या अपघातात को पायलट बचावला असून  या चौकशीत त्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे. कारण तो अपघातावेळी कॉकपिटमध्ये होता.

भारतीय हवाई दलात AN-32 विमान गेल्या चार दशकांपासून महत्त्वाची भूमिका पार पाडतंय. कारगील युद्धापासून बचावकार्य राबवण्यामध्ये या विमानाची महत्त्वाची भूमिका होता. यापूर्वी देखील हे विमान क्रॅश झालं आहे.भारताच्या गरजा लक्षात घेऊन रशियाकडून एंतोनोव डिझाईन ब्यूरोकडून तयार करण्यात आलं आहे. ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेशातील पर्वतीय आणि दुर्गम भागापासून ते सियाचीन आणि लडाखच्या दुर्गम भागात भारतीय सैन्याला रसद पोहोचवण्यात या विमानानं महत्त्वाची भूमिका बचावली आहेत. भारतीय हवाई दलात AN-32 विमान 1984 मध्ये दाखल झोलं होतं.

 

भारतीय हवाई दलासाठी सुरुवातीला AN32 या मॉडेलची 118 ते 123 विमानं खरेदी केली होती. त्यापैकी 110 विमानं सध्या कार्यरत आहेत. काही विमानांना AN-32RE मॉडेलमध्ये अपडेट करण्यात आलं आहे.

हेदेखील वाचा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 13 जून 2026 | शनिवार

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं

खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?

शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवणार का? आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार