टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

झिपलाईनिंग करण्यासाठी 30 फूटावर गेली अन् … पाय सटकला …. तरुणीचा मृत्यू

Follow Us:

कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

Pune: पुण्यातील तरुणीला झिपलाईनिंग हा साहसी खेळ खेळणं चांगलंच भोवलं आहे. झिपलायनिंग करताना 30 फूट उंची वरून कोसळून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात घडली आहे.  तरल अटपाळकर अस मृत्यू झालेल्या 28 वर्षीय तरुणीचं नाव आहे. या प्रकरणातून वॉटरपार्कच्या मालकासह चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली हेाती. (Pune Water Park Zipplining Death)

नक्की घडले काय?

कुटुंबासोबत राजगड वॉटरपार्कमध्ये साहसी खेळ आणि मौज करण्यासाठी गेलेल्या तरुणीला झिप लाईन हा खेळ जीवावर बेतलाय. पुण्यातील भोर तालुक्यात ही घटना घडलीय. झिपलाईन करण्यासाठी तरुणी 30 फूट उंचीवर गेली. यात रोपवरून चालत असताना तिने सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंगला अडकवण्याचा प्रयत्न केला. पण रेलिंगपर्यंत हात जात नसल्याने जवळ असलेल्या लोखंडी स्टूलवर ती उभी राहिली. मात्र, स्टूल हलला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय सटकला आणि ती थेट 30 फूट उंचीवरून खाली पडली. यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच वॉटरपार्कचा निष्काळजीपणादेखील समोर आला आहे. यानंतर तिला तात्काळ नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पंरतु, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली  आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. कुटुंबाच्या डोळ्यादेखत तरुणीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचा:

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंनी ठरवलंय एक पाऊल पुढे टाकायचं, भूतकाळात जायचं नाही; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर…

Vidhan Parishad Election 2026: 12-4-1…विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल, कुणाला किती जागा?

What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?

Ambenali Ghat Scorpio Accident: चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयानक दृश्य

आंबेनळी घाटातील अपघाताचं कारण आलं समोर, दिवसभर थकल्यानंतर रात्री… पोलिसांची मोठी अपडेट काय?

इराण आणि अमेरिका युद्धविराम करारात इस्त्रायलचा मिठाचा खडा, जगावर मोठं संकट..