टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

3 मार्च 2025 | सोमवार

  • धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वादळी सुरुवात,”महाराष्ट्र मे दो ही गुंडे, कोकाटे-मुंडे, कोकाटे – मुंडे”, विरोधकांची घोषणाबाजी

  • अभिव्यक्तीची मुस्कटदाबी आणि अमेरिकेकडून भारतीयांना अपमानास्पद वागणूक, आमदार जितेंद्र आव्हाड थेट हातात बेड्या घालून विधानभवनात

  • माणिकराव कोकाटे, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड 15 मिनिटं चर्चा, कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

  • विधान परिषदेच्या रिक्त जागांची निवडणुक जाहीर, 27 मार्चला मतदान आणि मतमोजणी

  • विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना , तर विधानपरिषदेवर काँग्रेस दावा करणार, मविआच्या बैठकीत ठराव झाल्याची माहिती

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधानसभा उपाध्यक्ष पद, अजित पवारांकडून राजकुमार बडोलेंना संधी मिळण्याची शक्यता

  • राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांचा दावा

  • वांद्रे दंडाधिकारी कोर्टाच्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेकडून सत्र न्यायालयात आव्हान, करुणा मुंडेची बाजू अंशत: मान्य करत, पोटगीसाठी पात्र असल्याच्या निर्णयाला आव्हान

  • केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन, तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

  • ‘लाडकी बहीण’ योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये: गत महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार, अदिती तटकरेंची माहिती

  • रोहित शर्मा लठ्ठ आणि निष्प्रभ कर्णधार, काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांचं वादग्रस्त वक्तव्य, नशिबानं कर्णधार बनला असेही तोडले तारे

  • रोहित शर्मा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, तो देशासाठी खेळतोय, त्याच्याबद्दल असं बोलणे चुकीचं, रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांचं जशास तसं उत्तर

  • ठाकरे – फडणवीसांत जवळीक वाढली का?: ​​​​​​​राऊतांच्या भावाला मानाचे पान, सरदेसाई CM च्या भेटीला; ठाकरेंच्या आमदारांचे तोंड झाले गोड

  • आकाश आनंद यांची बसपातून हकालपट्टी: मायावती म्हणाल्या- ते सासऱ्यांच्या प्रभावाखाली काम करत होते; काल सर्व पदांवरून काढले होते

  • अक्षर पटेल म्हणाला- वरुणचा चेंडू समजणे कठीण: टी-20 विश्वचषकानंतर त्याने पुनरागमन केले, आता तो पूर्णपणे तयार

  • अजिंक्य रहाणे KKRचे नेतृत्व करणार: 23.75 कोटींना विकलेला व्यंकटेश अय्यर उपकर्णधार; श्रेयसच्या नेतृत्वात मागील IPL जिंकला होता

  • सेमीफायनलसाठी माजी भारतीय प्रशिक्षक शास्त्री यांनी निवडली संभाव्य प्लेइंग-11: म्हणाले- भारत न्यूझीलंडविरुद्ध तोच संघ मैदानात उतरवेल, उद्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल

हेही वाचा :

Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना

दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले

Election: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक; विधान परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

लव्ह जिहाद, लँड जिहाद नंतर आता राज्यात फ्रूट जिहाद; पडळकरांच्या आरोपांनी खळबळ

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 16 एप्रिल 2026 | गुरुवार

Satara News: महाराष्ट्रातील पहिलं जनावरांचं ‘ब्युटी पार्लर’; मान्याची वाडीच्या भन्नाट उपक्रमाची चर्चा, राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी कहाणी

Gold Silver Price Today: 10 ग्रॅम सोन्याचा दर पुन्हा एकदा दीड लाखांच्या पार; चांदीची चमकही वाढली, जाणून घ्या आजचे दर

Ladki Bahin Yojana : 68 लाख लाडक्या बहिणींनी धरलं डोकं; खात्यावर नाही जमा होणार रक्कम, अपात्रतेच्या यादीत तुमचं नाव नाही ना?

Maharashtra Live News 16th April 2026 : महिला आरक्षणासाठी मोठी पावले, आजपासून सुरु होणाऱ्या विशेष अधिवेशनात सविस्तर चर्चा