टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोल्यात मध्यरात्रीचा थरार! दरोडेखोरांनी कोल्हापूरच्या कुटुंबाला लुटले; अडीच लाखांसह मुद्देमाल लंपास

सांगोला-पंढरपूर रोडवरील ब्रिजजवळ घडला प्रकार

सांगोला : चारचाकी वाहनातून पाठलाग करत कार अडवून प्रवाशांना धमकावत अडीच लाख रुपयांची रोकड, मौल्यवान वस्तू असलेल्या बॅगा आणि दोन मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेले. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. २२) रात्री ११ वाजता सांगोला-पंढरपूर मार्गावरील सोलापूर रोड ब्रिजजवळ घडला.

याप्रकरणी दिलीप भागोजी पाटील (रा. भोगम कॉलनी, चिंचवड, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली असून, अज्ञात ३० ते ३५ वयोगटातील चौघांविरुद्ध बुधवारी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप पाटील, त्यांची पत्नी सत्यकला पाटील आणि ओळखीचे चालक रामचंद्र साळुंखे हे तिघे २१ मार्च रोजी सायंकाळी कोल्हापूर येथून एमएच-०९-जेयू-०३७१ या कारने निलंगा (जि. लातूर) येथे जात होते. घराच्या बांधकामासाठी लागणारी सुमारे दोन लाख ५० हजार रुपयांची रोकड त्यांनी कपड्यांच्या बॅगेत ठेवून कारच्या डिकीमध्ये ठेवली होती.

दरम्यान, सांगोला हद्दीत रात्री जेवणासाठी थांबल्यानंतर ते पुढे निघाले असता, पाठीमागून आलेल्या विना नंबरच्या काळ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या कारला कट मारून थांबवले. त्यानंतर एका व्यक्तीने चालकाजवळ येत शिवीगाळ व हुज्जत घालत वाद सुरू केला. त्याचवेळी इतर तिघांनी चालक व फिर्यादीला दमदाटी करत गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

या गोंधळात दोघांनी कारची डिकी उघडून अडीच लाख रुपयांची रोकड, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, कपडे व इतर मौल्यवान वस्तू असलेल्या दोन बॅगा काढून घेतल्या. तसेच चालकाचे दोन मोबाइलही जबरदस्तीने हिसकावून घेतले.

फिर्यादी, त्यांची पत्नी व चालक यांनी आरडाओरडा केल्याने आरोपी चौघेही त्याच गाडीतून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाला फाशीच!, चिमुकलीवर अत्याचार करुन संपवणाऱ्या भीमराव कांबळेला शिक्षा, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

Nagpur Accident News: थरारक ! रस्त्यांवर रेसिंगच्या नादात भरधाव कार थेट पोहेवाला शॉपमध्ये घुसली

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा

Kolhapur Accident News: इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी

सांगोला-महूद रोडवर हृदयद्रावक अपघात; अपघाताने हिरावला आक्रमक चेहरा