टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल – माजी आमदार शहाजीबापू पाटील

Follow Us:

शासकीय योजना तळागाळात पोहोचवण्याचे स्वप्न घेऊन जनतेसमोर – चेतनसिंह केदार सावंत

सांगोला (प्रतिनिधी): ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महायुतीला पाठिंबा देणे काळाची गरज आहे. गावागावातील रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची समस्या, वीजपुरवठ्यातील अडचणी, आरोग्य व शिक्षण सुविधा यांसारखे मूलभूत प्रश्न. सोडवण्याचे काम महायुतीच करू शकते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले असून या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेआहे. ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल, असा विश्वास व्यक्त करत महायुतीच्या माध्यमातूनच गावांचा चेहरामोहरा बदलू शकतो, असेही माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी नमूद केले.

        महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत, चोपडी पंचायत समिती गणाचे उमेदवार अजय सरगर, राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार डॉ.सदाशिव दबडे यांच्या प्रचारार्थ उदनवाडी, चोपडी, पाचेगाव, बलवडी येथे प्रचार सभा घेण्यात आली.

        यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, “महायुतीचे सरकार म्हणजे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे जिल्हा परिषद स्तरावरून उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी वापर करून विकासकामे वेगाने मार्गी लावली जातील. केंद्र व राज्य शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून प्रत्येक सामान्य कुटुंबाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न महायुतीने पाहिले आहे, आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत,” अशी ठाम भूमिका चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी महायुतीच्या वतीने जनसंवादाच्या माध्यमातून मांडली.

       यावेळी पाचेगाव येथील सरपंच संगीता संजय भोसले, निवृत्ती मिसाळ गुरुजी, गोरख भोसले, संजय भोसले, तानाजी मिसाळ , आण्णासो पाटील, आबासो पाटील, दत्तात्रय मिसाळ, भारत मिसाळ, पोपट घुले, दुर्योधन घुले, भारत चव्हाण, तात्यासो मिसाळ, महेश गुरव, चोपडी येथील सरपंच श्रीमंत सरगर, उपसरपंच पॉपटशेठ यादव, दगडू बाबर, आर.एस.बाबर सर, सुरेश बाबर, अनिल चौगुले, मेजर अमोल बाबर, विनायक बाबर, बंडू मेखले, ॲड .शरद यादव, लक्ष्मण चौगुले, पोपट बाबर, विठ्ठल जरग, बाळासो बाबर, सचिन खळगे, सुरेश जाधव, बलवडी येथील मारुती शिंदे, महादेव शिंदे, दत्तात्रय निंबाळकर, साहेबराव शिंदे, विनायक शेंबडे, जैनुद्दीन शेख, जुबेर मुजावर, प्रशांत वलेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now