maharashtrapoliticaltop news

लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? फडणवीसांची सभागृहातून गुड न्यूज, अखेर तारीख समोर

अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. ही एक सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर जुलैपासून लगेचच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. जुलैपासूनचे ते नोव्हेंबरपर्यंतचे पाच हापते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र आता डिसेंबरचा हपता सरकार कधी जमा करणार? खात्यामध्ये पैसे किती जमा होणार? 1500 की 2100 याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सभागृहात दिली आहेत.

नागपुरात हिवाळी अधिवेश सुरू आहे. यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील हल्लाबोल केला. आम्ही जी आश्वासनं दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सभागृहात म्हटलं.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?  

आमची एकही योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीयेत. आपण ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देत आहोत.

 

Related Articles

Back to top button