दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
आधुनिक खगोलशास्त्राचा उद्गाता काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं 86 व्या वर्षी पुण्यात निधन
इंदिरा गांधींनी परदेशातून भारतात बोलावून घेतलं, टीआयएफआरमध्ये कार्य, आयुका संस्था उभारणीत योगदान; जयंत नारळीकरांची प्रेरणादायी कारकीर्द
कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू, दीड वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूने सारेच हळहळले
रिक्षाला धडक देऊन कल्याणमधील उल्हास नदीत भलामोठा हायवा ट्रक कोसळला, ड्रायव्हर सुखरुप रिक्षातील महिलेचा मृत्यू
पुण्यात वादळी वाऱ्यासह धुव्वादार पावसाने भलंमोठं होर्डिंग कोसळलं; राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधारा, जालन्यात वीज पडून 4 जनावरं ठार
मान्सून भारताच्या जवळ पोहोचला, केरळमध्ये पुढील 4-5 दिवसांत दाखल होणार
पुण्यात शिवसेना शिंदेंचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार; दुचाकीवरुन आलेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू
मी शपथ घेतो की…; अखेर छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; धनंजय मुंडेंच्याच खात्यावर वर्णी जवळपास निश्चित
फडणवीस तुम्हाला सभ्य माणसं मिळत नाहीत का? छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने अंजली दमानिया चिडल्या
अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत; छगन भुजबळांना मंत्रिपद मिळताच मनोज जरांगेंचा थेट उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
यह तो झाकी है, आता जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळेंनाही लवकरच मंत्रिपद मिळणार; छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच लक्ष्मण हाकेंचा दावा
राज्यात कोरोनाचे 53 रुग्ण; रुग्णसंख्या वाढली तरी घाबरु नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचं आवाहन
राज्याचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
केंद्रीय मंत्री किरण रिजीजूंचा उद्धव ठाकरेंना फोन, विदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळात ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनाही स्थान
गडचिरोलीत 36 लाखांचे बक्षीस असलेल्या पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये होते सक्रिय
जळगावमध्ये एसटीचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात, भरधाव बसने चौघांना उडवले; 2 ठार 2 गंभीर जखमी