healthindia worldmaharashtrasolapurtop news

हुडहुडी वाढली! पुढील ७ दिवस राज्यभरात थंडीची लाट कायम

मुंबई : काही दिवसांपासून राज्यात हुडहुडी लागण्याची (Winter Season) सुरुवात झाली असून बदलत्या वातावरणाचा नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशातच अवघ्या बारा तासांत राज्यातील बहुतांश भाग थंडीने गारठला आहे. तर ही थंडी आठवडाभर कायम अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. (Weather Update)

उत्तर भारतात पाकिस्तानातून पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला असून, अवघा देश गारठण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर भारतातून महाराष्ट्रात शीत लहरी वेगाने दाखल झाल्याने दोन दिवस आधीच राज्य गारठण्यास सुरुवात झाली. प्रामुख्याने जळगावचा पारा मंगळवारी राज्यात सर्वात कमी ८ अंशांच्या खाली आला. त्यापाठोपाठ नाशिक, अहिल्यानगर, पुणे शहरासह विदर्भातील नागपूर आणि परिसर गारठला आहे. थंडीची ही लाट १८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

इतर राज्यातील काल आहे तापमान?

जळगाव ८, नाशिक ९.४, अहिल्यानगर ११.७, छ. संभाजीनगर १२.२, परभणी १२.५, महाबळेश्वर १३.२, अकोला ११.८, बुलढाणा ११.४, अमरावती १२.३, ब्रम्हपुरी १३.८, चंद्रपूर १२.५, गोंदिया १२.२, नागपूर १२, वाशिम १९.६, वर्धा १२.४, Q मुंबई (कुलाबा) २०.८, सांताक्रूझ १८, रत्नागिरी २१.१, कोल्हापूर १९.१, मालेगाव १६.८, सांगली १८.१, सातारा १५.८, सोलापूर १९.१, धाराशिव १६.३. (Weather Update)

Related Articles

Back to top button