maharashtrapoliticalsolapurtop news

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

10 डिसेंबर 2024 | मंगळवार

  1. मुंबईत बसचालकाने 30-40 वाहनांना चिरडले: 7 ठार, 49 जखमी, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर; आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

  2. सरपंच हत्या प्रकरण दाबायच्या भानगडीत पडू नका: राज्यातील शांतता भंग झाल्यास मुख्यमंत्री जबाबदार – मनोज जरांगे

  3. पराभव जिव्हारी – बाळासाहेब थोरात दिल्लीत: खरगे, शरद पवारांची घेतली भेट; पक्षांतर्गत बदलाची कोणतीच चर्चा नसल्याचा दावा

  4. आसारामला तिसऱ्यांदा पॅरोल मिळाली: 15 डिसेंबरपासून पुण्याच्या आयुर्वेदिक रुग्णालयात 17 दिवस उपचार घेतील

  5. धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंनी माळशिरसमधील सभेतून दिलं आव्हान

  6. सुप्रिया सुळे आणि निवडून आलेल्या आमदारांनी राजीनामा द्यावा, त्याशिवाय EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

  7. असली 5 उंदरं पवार साहेब रोज नाश्त्याला खातात: पडळकर-खोतांच्या टीकेला जानकरांचे प्रत्युत्तर, सातपुतेंवरही साधला निशाणा

  8. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे आदेश काढा: मी अन् उत्तम जानकर राजीनामा द्यायला तयार, नाना पटोलेंचे मारकडवाडीत मोठे वक्तव्य

  9. उद्धव ठाकरे अजूनही झोपी गेले आहेत, राज्यातील जनतेने धुवून काढलं तरी ते सुधारणार नाहीत , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

  10. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम आणि VVPAT मधील मतमोजणीत कुठेही तफावत नाही, निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी

  11. देश बहुसंख्यांकांच्या इच्छेनुसार चालेल, हायकोर्टाचे न्या. शेखर कुमार यादव यांचे वक्तव्य; सुप्रीम कोर्टाकडून दखल

  12. बांगलादेशमध्ये हिंदुंवर अत्याचार, संजय राऊत पंतप्रधान मोदींवर संतापले; म्हणाले, हे पाकिस्तानमध्ये झाले असते तर इंडिया गेट समोर उभे राहून पंतप्रधान मोदींनी भाषण केले असते

  13. राहुलने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर परत जावे आणि रोहितने डावाची सुरुवात करावी, ॲडलेड कसोटीत पुरती लाज गेल्यानंतर सुनील गावसकर यांचा रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला

🔹🔹🔹
सौजन्य –
✨ *हॉटेल जयनिला* ✨
चविष्ट व उत्तम शाकाहारी व मांसाहारी …. जेवण मिळवण्याचे एकमेव ठिकाण…
🔸♦️🔸♦️
सोलापूर कोल्हापूर हायवे, सांगोला बायपास राऊत मळा, सांगोला – 413307
मो.8007812004

 

 

 

 

 

 

Related Articles

Back to top button