टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

आमच्या 26 महिलांचा सिंदूर पुसला, आमची माणसं मेली; डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? संजय राऊतांचा संतप्त सवाल

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झाली असून आगामी काळातलं युद्ध टळलं आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आता दोन्ही देशांनी एक-एक पाऊल मागे घेतलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर भारत-पाकिस्तानात शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. आता यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका […]

भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झाली असून आगामी काळातलं युद्ध टळलं आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर आता दोन्ही देशांनी एक-एक पाऊल मागे घेतलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर भारत-पाकिस्तानात शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. आता यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. यात डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय? आमची माणसे मेली आहेत, आमच्या २६ महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे कोणत्या अधिकाराने मध्यस्थी करत आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली, असं सांगण्यात येतंय हे चुकीचं आहे. तुम्ही जर व्हाईट हाऊसचे निवेदन पाहिलं किंवा ट्रम्प यांचं ट्वीटर अकाऊंट पाहाल तर ट्रम्प यांच्या विनंतीवरुन भारताने युद्धबंदी स्वीकारली. डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय, आमची माणसे मेली आहेत, आमच्या २६ महिलांचा सिंदूर पुसला आहे. मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे कोणत्या अधिकारान मध्यस्थी करत आहेत. भारत हा एक सार्वभौम राष्ट्र आहे. एक स्वतंत्र राष्ट्र आहे. १४० कोटी लोकसंख्येचे राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात म्हणून आम्ही युद्धबंदी करु, कोणत्या आधारावर कोणत्या अटी शर्तींवर भारताला काय मिळालं आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धानंतर भाजपने जाहिरात केली होती. पप्पांनी युद्ध थांबवलं म्हणजेच मोदींनी युद्ध थांबवलं असं म्हटलं जात होतं. मग आता अमेरिकेच्या पपांनी युद्ध थांबवलं का

पुरा बदला लेंगे, छोडेंगे नही अशी यांची भाषा होती. पाकिस्तानचे तुकडे करु, कुठे गेले तुकडे, भारताची बेअब्रू झाली आहे. पाकिस्तान मूर्ख देश आहे. जगभरात पाकिस्तानच्या पंतप्रधानानंचे विधान आहे की आम्ही युद्ध जिंकलं आहे. भारतासारख्या देशाला आणि पंतप्रधानाला हे शोभत नाही. कोणत्या अटी शर्थींवर युद्धबंदी केली यासाठी सर्वपक्षीय बैठक व्हायला हवं. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदींनी उपस्थितीत राहायला हवे. पंतप्रधान मोदींना पळ काढता येणार नाही. युद्धबंदीची गरज होत, लाहौर, कराची, इस्लामाबाद हे ताब्यात आले. ही वेळ पाकिस्तानला कायमस्वरुपी धडा शिकवण्याची संधी होती. भारतीये सेनेचे मनोबल प्रचंड उचावलेले होते. पण अचानक देशाच्या राजकीय नेतृत्वाने कच खाल्ली आणि आमच्या देशाचे आणि सैन्याचे मनोबल त्यांनी उद्ध्वस्त केले. हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी…

हे सुद्धा वाचा

IPL 2025 New Schedule: आयपीएलवर महत्वाचे अपडेट, देशभरात होणार सामने…कधी होणार नवीन तारखांची घोषणा

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List: 10 जागा, 10 उमेदवार…भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत…, विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!

मुंबई पायधोनी प्रकरण: बिर्याणी की कलिंगड? तज्ज्ञांनी सांगितले फूड पॉइझनिंगचे खरे कारण

अन् पोपट ठरला वन्यप्राणी… देशातील असा खटला ज्यामुळे सर्वांनी खाजवले डोके, शेतकरी तब्बल 10 वर्ष लढला; काय घडलं असं?

अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी विमान मालकाच्या खात्यात 9 कोटी, दुसऱ्या दिवशी त्याहून मोठी… रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…

होर्मुज खाडीत भडका, रशियाने दिला अमेरिकेला चकवा, होर्मुज खाडीतून थेट 4710 कोटी रुपयांचे..