टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Maharashtra Rain Weather Update:पुढील 48 तासांत राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; पुण्यासह राज्यात 27 जुलैपर्यंत महत्वाचे इशारे  

दरम्यान, कोकण किनारपट्टीसह संपूर्ण मुंबईनगरीत पहिल्याच दिवशी पावसाने तुफान हजेरी लावली. पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमधेही जोरदार पाऊस झालाय.

Maharashtra Weather Monsoon Rain Update: राज्यभरात जवळपास 20 दिवस उशिरा आलेल्या पावासने यंदा आगमनाची चांगलीच वाट पाहायला लावली. दरवर्षी साधारण  4 जूनदरम्यान कोकण किनारपट्टीवर दाखल होणारा मान्सून यंदा सोलापूर हर्णे भागातच अडखळला. त्यात प्रशांत महासागरातील ‘अल निनो’च्या प्रगतीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाट खडतर झाली होती. मात्र आता अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय झाला आहे. येत्या काही दिवसात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने  27  जुलैदरम्यान महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे इशारे दिले आहेत. (Monsoon Update)

दरम्यान, कोकण किनारपट्टीसह संपूर्ण मुंबईनगरीत पहिल्याच दिवशी पावसाने तुफान हजेरी लावली. पुण्यासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमधेही जोरदार पाऊस झालाय.

Weather Update:हवामान विभागाचा इशारा काय?

देशभरात नैऋत्य मान्सूनची प्रगती वेगाने सुरू असून 23  जून रोजी मान्सून मध्य अरबी समुद्रातील उर्वरित भाग, महाराष्ट्रातील मुंबईसह आणखी काही भाग, तसेच तेलंगणा आणि ओडिशामधील उर्वरित भागांमध्ये पुढे सरकला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांत, गुजरातमध्ये, महाराष्ट्रातील आणखी काही भागांत तसेच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिमेकडील वारे सुमारे 1.5 किलोमीटर उंचीपर्यंत अधिक मजबूत झाले असून उत्तर सोमालिया किनारपट्टीलगत कमी दाबाचा जेट प्रवाह सक्रिय आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Rain Today:कुठे कसा असेल पाऊस?

उत्तर कोकणात अनेक ठिकाणी  पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यातील काही भागांतही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी 40  ते 50  किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Weather Update:पुढील 48 तासांत राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; पुण्यासह राज्यात 27 जुलैपर्यंत महत्वाचे इशारे  

Pune Weather:पुण्यात यलो अलर्ट, पावसाचा जोर वाढणार

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून विविध भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. पुणे शहराला आजही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यातील काही तालुक्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. धरणसाखळी क्षेत्रातही आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे.मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पुणे शहरात जोरदार पाऊस कोसळत होता. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हलक्या सरी सुरू होत्या. त्यानंतर दिवसभर पावसाने विश्रांती घेतली, मात्र शहरात ढगाळ वातावरण कायम राहिले. आता पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.

Weather Update:विदर्भ -मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड आणि सोयगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. याच दरम्यान पुलावरून एक तरुण वाहून जात असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.जळगाव जिल्ह्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे रावेर आणि मुक्ताईनगर भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मध्यरात्री जळगाव शहरातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी शिरले. वाल्मीक नगर परिसरातील एका शाळेत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

अमरावती जिल्ह्यात मागील 24 तासांत सरासरी 17.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर अमरावती शहरात काल अवघ्या दीड तासात तब्बल 91.5 मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुंबईसह कोकण भागात शेतकऱ्यांना दिलासा

वसई-विरारमध्ये कालच्या मुसळधार पावसानंतर आज नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. नालासोपारा पूर्वेतील सेंट्रल पार्क परिसरात काल रस्ता पाण्याखाली गेला होता. मात्र आज सकाळी परिस्थिती नियंत्रणात दिसून आली असून रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही नियोजित वेळेनुसार सुरू आहे. तरी दिवसभरात पुन्हा पावसाच्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला आहे. भातलावणीसाठी योग्य रोपे तयार झाल्याने अनेक ठिकाणी लावणीला सुरुवात झाली आहे. मात्र पुरेसा पाऊस न झाल्याने काही शेतकऱ्यांना नदीतून पाणी उपसा करून शेतात चिखल तयार करावा लागत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांच्या बंडखोरीवर शरद पवार बोलले स्पष्ट, थेट..

मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर

Konkan Rain Updates: सिंधुदुर्ग, रायगडसह कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग! मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, वाचा सर्व अपडेट्स

धो डाला… पाणी तुंबले, वाहतूक कोंडी, घराघरात पाणी, पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण

Omraje Nimbalkar Operation Tiger: ओमराजे निंबाळकर खोटं बोलले, शिंदे गटात जाण्याचं प्लॅनिंग महिनाभरापासून, भावाचा महत्त्वाचा गौप्यस्फोट

Shivsena MP Opration Tiger Vikas Nidhi: विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या फुटलेल्या खासदारांची बुरखा टराटरा फाडणारी माहिती