टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची कारवाई

On: April 23, 2025 10:55 AM
Follow Us:

नुतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे अ‍ॅक्शन मोडवर

सांगोला:- वाहनचालकांकडे लायसन्स नसल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असून, फॅन्सी नंबर प्लेट लावणार्‍या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे सांगोला शहरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून शहरातील नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून शिस्तबद्ध व सुरक्षित वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन नुतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले.

सांगोला पोलीस स्टेशनमध्ये नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मंगळवार, दि.22 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई केली. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे फलक, दुकानदारांचे अतिक्रमण, तसेच ट्रिपल सीट दुचाकीस्वार, मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर बसवलेल्या गाड्या यांच्यावर कारवाई करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवर अयोग्य प्रकारे लावलेली वाहने देखील हटवण्यात आली.

दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून, या दुर्घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मुख्यत्वे वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहनचालकांची बेफिकिरी आणि भरधाव वेग हे अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी विशेष मोहीम हाती घेतल्यामुळे सांगोला वासियांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

नगरपालिकेच्या समोरील जागेमध्ये भाजी मंडई आहे. ग्रामीण भागातील छोटे मोठे शेतकरी बांधव व व्यापारी आपला माल या मंडईत व परिसरात रस्त्याच्या कडेला बसून विक्री करत असतात. या परिसरात सांगोला शहरातील नागरीक भाजी पाला, फळे खरेदी गर्दी करत असतात. मात्र या परिसरात वाहन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मिळेल त्या ठिकाणी आपले वाहन पार्किंग करावे लागते. त्यामुळे नगरपरिषदेने पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.

हे सुद्धा वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा