सांगोला च्या तरुणाचं नशीब उजळलं ! ड्रीम 11 मध्ये जिंकले 16 लाख रूपये

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सांगोला तालुक्यातील एका तरुणाने ड्रीम 11 मध्ये 16 लाख रुपयांची रक्कम जिंकली आहे. प्रमोद भोसले असे या तरुणाचे नाव आहे.

* धायटीच्या तरुणाचं नशीब उजळलं
* ड्रीम 11 मुळे बनला लखपती
* कोलकता विरुद्ध गुजरात सामन्यात बनवली होती टीम

भारतात सध्या आयपीएलचे सामने सुरु आहेत. दररोज मैदानावर चौकार षटकारांचा पाऊस पहायला मिळतो. कोट्यावधी लोक दररोज या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्याबरोबर अनेक क्रिकेटप्रेमी आपल्या ज्ञानाच्या आधारे ड्रीम 11 वर टीम लावतात. अशातच आता या ड्रीम 11 मुळे सांगोला तालुक्यातील धायटी येथील तरुणाचे नशीब उजळलं आहे. प्रमोद भोसले याने 16 लाख रुपयांची रक्कम जिंकली आहे. त्याच्या संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश होता ते सविस्तर जाणून घेऊयात.

सांगोला तालुक्यातील धायटी या गावचा रहिवासी असलेला प्रमोद भोसले या तरुणाने ड्रीम 11 मध्ये 16 लाख रुपये जिंकले आहेत. कोलकत्ता विरुद्ध गुजरात या सामन्यात त्याने ड्रीम इलेव्हनवर टीम बनवली होती. यात त्याने पहिला क्रमांक पटकावत 16 लाख रुपये जिंकले आहेत. त्यामुळे प्रमोदच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.

प्रमोद भोसले च्या संघात या खेळडूंचा समावेश

प्रमोद भोसले ने कोलकता विरुद्ध गुजरात या सामन्यात ड्रीम 11 वर टीम बनवली होती. त्याने आपल्या संघात जोस बटलर या कीपरचा समावेश केला होता. तसेच त्याने अजिंक्य रहाणे शुभमन गील साई सुदर्शन, आणि अंगक्रिश रघुवंशी या फलंदाजांची संघात निवड केली होती. त्याचबरोबर प्रमोदच्या संघात सुनील नारायण आंद्रे रसेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे ऑलराऊंडर खेळाडू होते. तसेच प्रसिद्ध कृष्णा रशीद खान मोहम्मद सिराज या गोलंदाजांचाही संघात समावेश होता.

शुभमन गिल मुळे जिंकले 16 लाख रुपये

प्रमोद भोसले याने त्याच्या संघात गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल याला कर्णधार बनवले होते. गिल ने या सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावले होते. गिलने या सामन्यात 352 पॉइंट्स मिळवले होते. तसेच प्रमोदने जॉस बटलर याला उपकर्णधार बनवले होते. बटलरने आक्रमक फलंदाजी करीत 166.5 पॉइंट्सची कमाई केली होती. या दोन खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे प्रमोदने 16 लाख रुपयांचे रक्कम जिंकली आहे.

हे सुद्धा पाहा

सुंदर दिसण्यासाठी आणि निरोगी शरीरासाठी स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर….

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon