टॉप 10 हेडलाईन्स

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

| 6 मार्च 2025 | गुरुवार

 

  1. मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून वाद, एकतर भैय्याजी जोशींना चिल्लर म्हणा, नाहीतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्ला

  2. जोशीबुवा, या असल्या काड्या घालून नवा संघर्ष उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवा, भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंचा प्रहार

  3. RSS च्या भैय्याजी जोशी यांचा यू-टर्न: चौफेर टीकेनंतर म्हणाले – माझ्या विधानामुळे गैरसमज झाला, मुंबईची भाषा मराठीच, ती सर्वांनी शिकावी

  4. जयकुमार गोरेला कोर्टाने ‘बाइज्जत बरी’ केले नाही: मी माफ केले म्हणून तो निर्दोष सुटला, पीडित महिलेचा खळबळजनक दावा

  5. राज्यातील कारागृहात 500 कोटींचा घोटाळा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टींचा आरोप, अधिकाऱ्यांचाही सहभाग, चौकशी करण्याची मागणी

  6. मोहित कंबोजांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानही हलत नाही, बड्या अधिकाऱ्याशी कनेक्शन; अंबादास दानवेंचा भर सभागृहात आरोप

  7. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद टोकाला, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंकडून अजितदादांचे खासदार सुनील तटकरेंना आलमगीर औरंगजेबाची उपमा

  8. अजितदादा म्हणाले होते, लाईट बिल आलं तर पवारांची औलाद सांगणार नाही, आता बिलं का आली, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचा सवाल, जुनी आणि नवी वीजबिलं दाखवली

  9. पुण्यातील यवतमध्ये घरावर चड्डी-बनियन गँगचा दरोडा, कुटुंबातील तरुण मुलाला वार करुन संपवलं; पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरु

  1. बीडच्या सतीश भोसलेचा करेक्ट कार्यक्रम: बॅटने अमानुष मारहाण केल्यासंबंधी गुन्हा दाखल; सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप

  2. अधिवेशन: मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच, इतर भाषांचाही इथे सन्मान; देवेंद्र फडणवीसांचे सभागृहात उत्तर

  3. भाजपच्या पोटातले ओठात आले: भैय्याजी जोशींवर कारवाई करा, मुंबईची भाषा मराठीच हे त्यांना सांगितले गेले पाहिजे -आदित्य ठाकरे

  4. द. कोरियात लढाऊ विमानाने लोकांवर 8 बॉम्ब टाकले: 1 फुटला, 15 जखमी; पायलटने चुकीचे ठिकाण नोंदवले होते

  5. सतीश भोसलेवर कारवाई झालीच पाहिजे: तो काय उद्योग करतो माहिती नाही, मारहाणीचे समर्थन केले नाही- सुरेश धस

  6. क्रिकेटपटू मुशफिकुर रहीम वनडे क्रिकेटमधून निवृत्त: वनडे क्रिकेटमध्ये बांगलादेशचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज, सोशल मीडियावर दिली माहिती

  7. दुखापतीमुळे कार्स IPL-2025 मधून बाहेर: हैदराबाद संघात मुल्डरचा समावेश; 22 मार्चपासून सुरू होईल लीग

 

हेही वाचा

आता हद्द झाली… 3 चोर आले, चक्क ATM च घेऊन गेले

Champions Trophy 2025 Final : फायनलचा महासंग्राम ठरला! भारतविरुद्ध न्यूझीलंड रंगणार थरार

सांगोला तालुक्यातील घटना; बैलगाडीची धडक बसून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon