सांगोला -बैलगाडी शर्यतीतील धावणार्या दोन बैलगाड्या अचानक प्रेक्षकांच्या गर्दीत घुसून बैलगाडीची धडक बसून छातीला गंभीर मार लागलेल्या तरुणाचा उपचारापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास महूद – महिम ता.सांगोला रस्त्यालगत शर्यतीच्या पटांगणात घडली. सुरेश हरीआप्पा मरगर वय-40 रा.महिम ता. सांगोला असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ पत्नी एक मुलगा असा परिवार आहे.
याबाबतची माहिती अशी की महूद -महिम येथील हौशी बैलगाडा संघटनेच्या वतीने मंगळवारी महिम रोड वरील हनुमान मंदिराच्या पूर्वेकडील बाजूस बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते शर्यतीसाठी सुमारे 250 बैलगाडी सहभागी झाल्या होत्या तर शर्यती पाहण्यासाठी महिम महूद व परिसरातील हजारो प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास धावणार्या बैलगाड्या पैकी दोन बैलगाड्या अचानक प्रेक्षकात घुसल्या एका बैलगाडीची जोराची धडक त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुरेश मरगर यास बसून छातीला गंभीर मार लागला त्याला त्रास होऊ लागल्याने नातेवाईकांनी त्यास उपचाराकरता अकलूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले दरम्यान आयोजकाकडून बैलगाडी शर्यतीसाठी पोलीस स्टेशनकडून परवानगी घेतली असेल तर पोलिसांनी शर्यतीच्या ठिकाणी प्रेक्षकांच्या सुरक्षेची पाहणी केल्यानंतरच प्रत्यक्ष शर्यतीला परवानगी देणे गरजेचे होते परंतु तशी काळजी घेतली नाही असा आरोप प्रेक्षकांनी केला आहे.
बैलगाडा शर्यतीच्या आयोजकाकडून शर्यती दरम्यान आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेतली नाही त्यामुळे शर्यतीतील बैलगाडी प्रेक्षकाच्या गर्दीत घुसल्याने सुरेश मरगर यास आपला जीव गमवावा लागला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
हे सुद्धा वाचा
सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी सांगोला बंद