Sunday, September 8, 2024
Hometop newsउष्माघाताचा राज्यातील पहिला बळी

उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी

सोलापूरसह अन्य भागात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

राज्यात उष्णतेची लाट आली असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. दरम्यान, उन्हाचा तडाखा आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताच्या घटनाही वाढताना दिसत आहेत.

वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होत असून आता पालघरमध्ये उष्माघाताने १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. अश्विनी विनोद रावते असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

ही घटना पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमधील केव वेडगे पाडा येथे घडली आहे. काल दुपारच्या सुमारास अश्विनीचा उष्माघाताने मृत्यू झाला. अश्विनी मनोर मधील एस.पी. मराठी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती.

काल दुपारी अश्विनी अकरावीचा पेपर देऊन घरी आली होती. घरात कोणीच नसल्याने ती आई-वडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेली. दुपारच्या उन्हाचा कडाक्याने तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोसळली.

अश्विनीचे शेत गावापासून काही किलोमीटर अंतरावर असल्याने व दुपारच्या वेळी कोणीही घराबाहेर पडत नसल्याने तिचा मृतदेह तब्बल दोन तास तसाच पडून होता. आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना अश्विनी घरी दिसली नाही. त्यांनी सगळीकडे त्यांची शोधाशोध केली. त्यानंतर नदीजवळच्या शेतात तिचा मृतदेह पडल्याचे दिसून आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments