नाशिक 26 ऑगस्ट (हिं.स.) – येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाबरोबर जायचं हे वेळ बघून ठरविले जाईल अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. आंबेडकर हे सोमवारी नाशिक दौऱ्यावरती होते.
यावेळी ते म्हणाले की, सध्या जे लहान मुलींवरती आणि महिलांवर ती अत्याचार होत आहे ते चुकीचे आहेत पण यासाठी जे सायको निर्माण केले आहेत ते भाजपा आणि आरएसएस च्या नीतीमुळे निर्माण झालेले आहेत असा आरोप करून ते पुढे म्हणाले की, या दोघांनी पण सतत त्याने दलित मुस्लिम मराठा ओबीसी यांच्यामध्ये नेहमी संघर्ष लावला आणि या संघर्षामुळे काही सायको प्रवृत्ती निर्माण झाली . आणि त्यातूनच असे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या पेसा साठी सुरू असलेल्या आंदोलन स्थळी देखील भेट दिली यावेळी त्यांनी आदिवासींचे प्रश्न समजून घेतले यावरती बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्या पद्धतीप्रमाणे बोगस आदिवासी भरती प्रकरण समोर आले त्याच पद्धतीप्रमाणे आता नवीन भरती व्हायला पाहिजे परंतु त्यावर आदिवासींमध्ये अन्याय होता कामा नये आणि अन्य प्रवर्गाची देखील भरती देखील केली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.