सातारा: खासगी बँकेतून कर्जासाठी दिलेल्या अर्जाच्या आधारावर मंजूर झालेले २० लाख रुपयांचे कर्ज दोन एजंटांनी गायब केले. वीस लाख रूपयांचा गंडा घालणाऱ्या एजंटांचे नाव राकेश सिद्धार्थ अंजुटे (रा. घर नंबर १०४, प्रथमेश बिल्डींग सावकारी पुरा, सराफ लाइन डेक्कन जिमखाना, पुणे) व प्रतिक बंटी असे आहे.
या प्रकरणी रघुनाथ बालाप्पा कुंभार (वय ५१ रा. हरीसाई पार्क, चाटे स्कूलच्या जवळ, सातारा परिसर) यांनी सातारा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रघुनाथ बालाप्पा कुंभार यांनी ३ जून २०२४ ते ४ जुलै २०२४ दरम्यान पुणे येथील एका खासगी बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेत कर्ज प्रकरण झाल्यानंतर बँकेने २० लाख रूपयांचे कर्ज मंजूर केले. २० लाखांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर राकेश सिद्धार्थ अंजुटे व प्रतिक बंटी यांनी त्यांच्या खात्यावर चार लाख रुपये पाठवले.
रघुनाथ कुंभार यांनी संबंधितांना कॉल करून, तुम्ही चार लाखच कसे पाठवले, २० लाख रुपये पूर्ण जमा करा. असे सांगितले. संबंधित एजंटानी माझे वैयक्तिक चार लाख तुमच्या खात्यावर आले आहे. ते तुम्ही परत पाठवा. मी वीस लाख रुपये तुम्हाला टाकतो, असे सांगितले. कुंभार यांनी सदर एजंटावर विश्वास ठेवून चार लाख रुपये त्यांच्या खात्यावर परत पाठविले.
चार लाख परत पाठविल्यानंतर सदर एजंटांनी २० लाख कुंभार यांच्या खात्यावर ट्रान्स्फर केले नाही. सदर कर्जाचे हप्ते सुरू झाले. बँकेने ईएमआय भरण्यासाठी तगादा सुरू केला. सदर एजंटांना सपंर्क केल्यानंतर तुम्ही ईएमआय भरा असे सांगून पैसे भरतो, असे सांगितलं. कुंभार यांनी न घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरूनही सदर एजंटानी २० लाख रुपयांचे रक्कम दिली नाही. या प्रकरणी दोन्ही एजंटांच्या विरोधात सातारा पोलिस दाखल करण्यात आला आहे.
Read Also
Weight Loss: पनीर किंवा मशरूम वजन कमी करण्यासाठी काय खावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगरची चर्चा, डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये