Nashik Accident: तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली अन्…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Nashik Accident : सातपूर एमआयडीसीतील बॉश कंपनीकडून महिंद्रा कंपनीकडे एक तरुण दुचाकीवरून जात असताना त्याचा भीषण अपघात झालाय.

Nashik Accident : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सातपूर (Satput) परिसरात 22 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झालाय. तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली आणि तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा (Nashik Accident) व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर एमआयडीसीतील (Satpur MIDC) बॉश कंपनीकडून महिंद्रा कंपनीकडे (Mahindra Company) मयत तेजस गंगाराम बन्से (22, रा. सावरगाव) हा आपल्या दुचाकीने जात होता. प्रबुद्धनगर येथील बाबासाहेब बेकरीसमोर तो आला असता एम. एच. 15 ईजी 0302 या क्रमांकाच्या डंपर शेजारून जात होता.

सिमेंट मिक्सर खाली चिरडला गेल्याने मृत्यू

त्यानंतर तरुणाची दुचाकी सिमेंट मिक्सर ट्रकच्या खाली गेली. या अपघातात तरुण चिरडला गेल्याने त्याचा मृत्यू झालाय. या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला असून तो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  सातपूर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Nashik Accident: तरुणाची बाईक सिमेंटर मिक्सरच्या चाकांखाली गेली अन्…

दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, राज्य सरकार लढवणार नवी शक्कल

वक्फ बोर्ड बंद करून सनातनी बोर्ड स्थापन करा – नवनीत राणा

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon