Sunday, September 8, 2024
Homeweatherराज्यात पुढील चार दिवस थंडीचे

राज्यात पुढील चार दिवस थंडीचे

देशात मागील काही दिवसांपासून पावसाचे ढग दाटले होते. त्यामुळे अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. यात मेंडोंस चक्रीवादळाचा परिणाम सध्या कमी झाल्याने तापमानात कमालीची घट झाली. यात महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान या राज्यात थंडीची लाट आल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील तापमानातही मोठे चढउतार पाहायला मिळत आहे.
राज्यातही बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 30 अंशांच्या पार आहे. कमाल आणि किमान तापमानातही 11 ते 20 अंशांपर्यंतची तफावत दिसून येत आहे. यात पहाटे गारठा, तर दुपारी कडक उन्ह आणि रात्री पुन्हा गारठा, अशी स्थिती अनुभवायला मिळते.
यात धुळ्यात तापमानात घट होऊन ते 11 अंशावर पोहचेले आहे. सध्या राज्यातील मराठवाड्यासह, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. काही ठिकाणी तर तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आल्याने हुडहु़डी वाढली आहे. परिणामी 25 डिसेंबर मुंबई, पुणे, सोलापुरात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments