टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शाब्बास ! चेतेश्वर पुजाराने मोडला सर डॉन ब्रॅडमनचा विक्रम

On: December 23, 2022 9:32 AM
Follow Us:

सध्या भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरी कसोटी सुरू आहे. तीन स्पर्धेतील पहिली कसोटी जिंकून भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे. दरम्यान आज दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने मोठा विक्रम केला आहे. त्याने सर डॉन ब्रॅडमनचा विक्रम मोडला आहे. 

पुजाराने शुक्रवारी कसोटी क्रिकेटमध्ये सात हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणारा पुजारा हा भारतातील आठवा व जगातील 55 वा खेळाडू ठरला आहे. ब्रॅडमन यांनी 52 कसोटी सामन्यांमध्ये 99.94 च्या सरासरीने 6 हजार 996 धावा केल्या होत्या. पुजाराने आपली 98 वी कसोटी खेळताना 44.88 च्या सरासरीने 7 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. 
त्याने आतापर्यंत कसोटीत 19 शतके व 34 अर्धशतके ठोकली आहे. भारताकडून सर्वाधिक कसोटी धावा काढण्याचा विक्रम मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. सचिनने आपल्या कारकिर्दीत 15 हजार 921 धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now