टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी टीम इंडियाची उडवली खिल्ली

Follow Us:
टी-20 विश्वचषकात इंग्लंडकडून उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव झाल्याने भारतीय प्रेक्षकांची निराशा झाली. या पराभवावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळणारे ट्विट केले आहे, जे कदाचित भारतातील क्रिकेटप्रेमींना आवडणार नाही.
अंतिम सामन्याबाबत त्यांनी हे ट्विट केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विटरवर लिहिले की, या रविवारी 152/0 विरुद्ध 170/0 असा सामना होणार आहे.
शरीफ यांनी या ट्विटमध्ये याशिवाय इतर कशाचाही उल्लेख केला नाही, पण प्रत्यक्षात  शरीफ यांचे हे ट्विट टीम इंडियाला टोमणे मारणारे आहे कारण त्यात पाकिस्तान आणि इंग्लंडचे स्कोअरकार्ड आहे. ज्यात दोन्ही संघांनी भारताचा 10 विकेटने पराभव केला आहे. 
पहिले स्कोअरकार्ड हे पाकिस्तानचे 152/0 आहे जेव्हा शेवटच्या T20 विश्वचषकाच्या गट सामन्यात भारताला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून दहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यावेळीही भारताच्या गोलंदाजांना पाकिस्तानची एकही विकेट सोडता आली नव्हती. तर दुसरे स्कोअरकार्ड 170/0 हे आजच्या उपांत्य फेरीचे आहे जेव्हा इंग्लंडने भारताचा दहा गडी राखून पराभव केला होता. यामध्येही भारताला इंग्लंडची एकही विकेट घेता आली नाही.
यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी टोमणा मारला असला तरी त्यांचे ट्विट लोकांना आवडले नाही. सोशल मीडियावरील अनेक युजर्स यावर संतापले आहेत आणि पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकात भारताच्या सर्वोत्तम विक्रमांचा उल्लेख करत आहेत. पाकिस्तानचे सोशल मीडिया यूजर्स अशा प्रकारचे ट्विट केल्यामुळे शरीफ यांना ट्रोल करत आहेत. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य