टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: शंभुराज देसाईंनी धक्काबुक्कीचा वचपा काढला, अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरेंचा चेहरा पडला, शांतपणे बाहेर चालत आले अन् म्हणाले…

On: November 18, 2026 2:10 PM
Follow Us:

Satara District bank Chairman Election 2026: सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेना-राष्ट्रवादीने वचपा काढला, उदयसिंह पाटील उंडाळकरांची अध्यक्षपदी निवड

Jaykumar Gore on Satara District Bank Chairman Election 2026: सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या बुधवारी पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय नाट्य पाहायला मिळाले. या निवडणुकीपूर्वी भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सातारा जिल्हा बँकेवर भाजपचाच अध्यक्ष बसेल, अशी गर्जना केली होती. मात्र, आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत भाजपला खड्यासारखे बाजूला सारले आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी व उपाध्यक्षपदी आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणले.  राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर हे अध्यक्ष म्हणून निवडून आले तर शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण हे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले. सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची ही निवडणूक भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने शिवसेना व राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत भाजपकडून (BJP) झालेल्या पराभवाचा वचपा काढल्याचे बोलले जात आहे. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपला बाजूला ठेवत मंत्री जयकुमार गोरे यांना शह दिला आहे. (Satara District bank Election 2026)

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जयकुमार गोरे शांतपणे चालत बाहेर आले. प्रसारमाध्यमांनी शिवसेना-राष्ट्रवादीने वचपा काढल्याबद्दल विचारताच ते म्हणाले की, आता सातारा जिल्हा बँकेवर महायुतीचा अध्यक्ष झाला आहे.  नाराजीचा विषय नाही, ज्यांचं बहुमत आहे, त्यांचा अध्यक्ष झाला. कोणी कशाचा वचपा काढला हा आजचा विषय नाही, ती निवडणूक आम्ही वेगळी लढलो होतो. ही निवडणूक आम्ही एकत्र लढलो होतो. बाकी सगळ्या गोष्टी ऑफ द रेकॉर्ड आहेत. त्यासंदर्भात अधिक बोलणं उचित नाही, असे जयकुमार गोरे यांनी म्हटले.

एक निश्चित असते की, कुठलीही निवडणूक अंतिम नसते. सातारा जिल्हा बँकेतील सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याच्या चर्चेत मी कधी नव्हतो. त्यामध्ये शिवेंद्रराजे होते, मला काहीही माहिती नाही. या निवडणुकीत महायुतीने मला मतदान केलेले नाही, माझी बिलकूल नाराजी नाही. भाजपचा अध्यक्ष होणार, असे मी म्हटले होते.  मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहिलो आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यामुळे सहाजिकच आहे की, अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा व्हावा, असे गोरे यांनी सांगितले.

Jaykumar Gore: जयकुमार गोरेंचा चेहरा उतरला, शिवसेना-राष्ट्रवादीला इशारा

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का बसल्यानंतर जयकुमार गोरे हे बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. त्यांनी हसून हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसारमाध्यमांकडून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु होती. अध्यक्ष हा महायुतीचा झालेला आहे. उदयसिंह उंडाळकर यांना चेअरमन म्हणून माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या कालखंडामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बँक चालावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे त्यांनी म्हटले. मात्र, एक गोष्ट निश्चित असते की, कोणतीही निवडणूक अंतिम नसते. ‘आगे आगे देखो होता है क्या’, असा सूचक इशाराही यावेळी जयकुमार गोरे यांनी दिला.

आणखी वाचा

FASTag वापरताय? बॅलन्स कमी असल्यास टोल नाक्यावर भरावा लागेल दुप्पट टोल; प्रवासाला निघण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

FASTag वापरताय? बॅलन्स कमी असल्यास टोल नाक्यावर भरावा लागेल दुप्पट टोल; प्रवासाला निघण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या

Latur DCC Bank Election Result 2026: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निकाल जाहीर; देशमुखांच्या सहकार पॅनला स्पष्ट बहुमत, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Pandharpur Ambegaon Well Collapse: विहिरीच्या मोजमापासाठी उतरले, अचानक ढिगारा कोसळल्याने अडकले; 24 तासांनी 4 मजूरांचे मृतदेह सापडले, पंढरपुरातील आंबेगावातील सुन्न करणारी घटना

अखेर आतली बातमी फुटलीच? विलिनीकरणावर विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान, कुणाला मंत्रिपद…

मोठी बातमी! दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांमध्ये बैठक

NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर ‘त्या’ 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु