टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

हनुमान चालिसेने दिले धैर्य? स्मित माछर यांनी मोदींना सांगितला थरारक अनुभव

On: October 3, 2026 8:33 AM
Follow Us:

फ्लाय-दुबई विमानातील गंभीर घटनेनंतर चर्चेत आलेले भारतीय पायलट कॅप्टन स्मित माछर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी विमानातील संकटाच्या क्षणी आलेला अनुभव सांगितला.

स्मित माछर यांनी सांगितले की, गंभीर परिस्थितीत त्यांच्या डोळ्यासमोर अंधार झाला आणि ते खाली पडले होते. त्यानंतर त्यांना हनुमानाची प्रतिमा दिसल्याचे त्यांनी सांगितले. हनुमान चालिसेच्या पठणामुळे आपल्याला त्या कठीण प्रसंगी धैर्य आणि मानसिक बळ मिळाल्याचे माछर यांनी मोदींना सांगितले.

माछर यांच्या म्हणण्यानुसार, ते नियमितपणे हनुमान चालिसेचे पठण करतात. विमानातील संकटाच्या वेळीही ते हनुमान चालिसा म्हणत होते. त्यामुळे अत्यंत कठीण परिस्थितीतही आपला आत्मविश्वास कायम राहिला, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, फ्लाय-दुबईच्या बोईंग 737 विमानात कॉकपिटमध्ये सह-पायलटसोबत झालेल्या झटापटीत कॅप्टन माछर गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेतही त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर क्रू सदस्य आणि प्रवाशांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली आणि विमान सुरक्षितपणे उतरले.

या संवादादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन माछर यांच्या धैर्याचे कौतुक केले आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now