टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

परतीचा पाऊस पुन्हा बरसणार? महाराष्ट्रात मोठा इशारा

On: October 1, 2026 3:08 PM
Follow Us:

महाराष्ट्रात पावसाने काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर आता परतीच्या पावसाची शक्यता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, मराठवाड्यातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

पुणे आणि नाशिक घाटमाथ्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, बीड, धाराशिव, जळगाव, नंदुरबार आणि धुळे या भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ईशान्य बंगालच्या उपसागरात आणि आग्नेय बांगलादेश परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, राज्यभर सर्वत्र समान प्रमाणात पाऊस होईलच असे नाही.

दरम्यान, यंदाच्या मान्सून हंगामात देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 87 टक्के, तर महाराष्ट्रात 81 टक्के पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे परतीच्या पावसाकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now