आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारी बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली. या घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात सुमारे 6 लाख कोटी रुपयांची घट झाली.
सेन्सेक्समध्ये 850 हून अधिक अंकांची घसरण
शुक्रवारी सेन्सेक्स 73,895 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी तो 73,734 अंकांवर उघडला. मात्र बाजार सुरू झाल्यानंतर विक्रीचा दबाव वाढला आणि सेन्सेक्स काही वेळातच 73,138 अंकांपर्यंत घसरला. सकाळी 9:17 वाजेपर्यंत सेन्सेक्स सुमारे 512 अंकांनी घसरला होता.
निफ्टीही 23 हजारांच्या खाली
निफ्टी 50 शुक्रवारी 23,140 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी 23,065 अंकांवर सुरुवात झाल्यानंतर तो लगेचच 23 हजारांच्या खाली घसरला. त्यानंतर निफ्टीमध्ये आणखी घसरण झाली आणि तो 22,869 अंकांच्या आसपास पोहोचला.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ ही भारतीय बाजारातील घसरणीमागील महत्त्वाची कारणांपैकी एक ठरली. ब्रेंट क्रूडच्या किमतीत वाढ होऊन त्या 106 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील दबावाबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली.
अमेरिका-इराण तणावाचा परिणाम
मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि अमेरिका-इराणमधील संघर्षाचा थेट परिणाम जागतिक बाजाराच्या वातावरणावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबतची अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला.
दरम्यान, सप्टेंबर 2026 मध्ये भारतीय शेअर बाजारावर तेलाच्या वाढत्या किमती, जागतिक व्याजदर आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली विक्री यांचा दबाव राहिला. Reutersच्या 30 सप्टेंबरच्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये Nifty 50 मध्ये 6.1 टक्के तर Sensexमध्ये 5.8 टक्क्यांची मासिक घसरण झाली.
टीप : शेअर बाजारातील गुंतवणुकीत बाजारातील चढ-उतारांचा धोका असतो. गुंतवणूक करण्यापूर्वी अधिकृत माहिती आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.










