टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मसाला डोशात उंदीर?

On: September 29, 2026 3:00 PM
Follow Us:

मुंबईतील बोरिवली पश्चिम परिसरातून अन्नाच्या स्वच्छतेबाबत धक्कादायक घटना समोर आली आहे. एल.टी. रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये एका ग्राहकाच्या मसाला डोशात मृत उंदीर आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर ग्राहकाला मळमळ आणि उलट्या झाल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित त्रिवेदी हे आपल्या दोन भावांसह आणि मुलासोबत दक्षिण भारतीय पदार्थ खाण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी म्हैसूर मसाला डोसा ऑर्डर केला. डोशाचे काही घास खाल्ल्यानंतर त्यामध्ये छोटा मृत उंदीर आढळल्याचा दावा त्यांनी केला.

हा प्रकार लक्षात येताच अमित त्रिवेदी यांना धक्का बसला. त्यांना उलट्या सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांनी बोरिवली पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

या प्रकारामुळे संबंधित हॉटेलमधील स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन (FDA) किंवा महापालिका प्रशासनाकडून तपासणी आणि पुढील कारवाई होते का, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, बोरिवली पश्चिमेतील आणखी एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी FDA आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे. हॉटेलची पाहणी करून कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now