टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, ‘कॉकरोच’ला सरकार घाबरलं; विद्यार्थ्यांचा प्रचंड विजय!

Dharmendra Pradhan Resignation : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या आंदोलनाला प्रचंड मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

Dharmendra Pradhan Resignation : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या आंदोलनाला प्रचंड मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. काहीही झालं तरी जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका सीजेपीने घेतली होती. तरुणांनी आपले आंदोलन मागे घ्यावे यासाठी केंद्र सरकारने हर तऱ्हेने प्रयत्न केले. परंतु त्यात यश आलेच नाही. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांना टायफाईड झालेला असला तरी त्यांनी मैदान सोडले नव्हते. त्याचाच परिणाम म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याचे बोलले जात आहे.

राजीनाम्याआधी काय काय घडलं?

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत होता. कला, शिक्षण, मनोरंज क्षेत्रातूनही तरुणांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला जात होता. हे आंदोलन संपवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी सोनम वांगचूक यांची भेट घेतली होती. तसेच सीजेपीच्या प्रतिनिधींचीही त्यांनी भेट घेतली होती. अगोदर आम्ही कोणत्याही आंदोलक विद्यार्थ्यावर कारवाई करणार नाही, सर्व गुन्हे मागे घेऊ असे केंद्र सरकारने सांगितले होते. तसेच नीट पेपरफुटीचा खटला हा जलदगती न्यायालयात चालवला जाईल, असेही खुद्द पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले होते. या आश्वासनानंतर सोनम वांगचूक यांनी आपले उपोषण सोडले होते. परंतु दुसरीकडे जंतर मंतरवर आंदोलन करत असलेल्या सीजेपीने मात्र आंदोलन कायम राहील. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली होती.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Todays Horoscope : आजचे राशिभविष्य 24 जुलै 2026 : शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला,इच्छापूर्ती होणार ! पहा तुमचे राशिभविष्य काय सांगते ?

जंतर मंतरवरून जायचे की नाही अडीच तासात फैसला, दिल्लीत घडामोडींना वेग..

Sonam Wangchuk on Pradhan Resignation : “तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?”; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती

सॅमसंगचा सर्वात महागडा फोन लॉन्च! ‘Samsung Galaxy Z Fold 8 Ultra’ च्या किमतीत येईल जुनी कार

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?