CJP Protest Delhi on Pm Narendra Modi : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात विद्यार्थी आक्रमक झाले. त्यामध्येच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीत मोठे आंदोलन जंतर मंतरवर सुरू आहे. संसदेवर मोठा मोर्चा काढण्यात आला. ज्यामुळे हे आंदोलन अधिक चिघळले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांवरही हल्ले केले जात आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत. देशभरातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. संसद परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. हेच नाही तर विरोधकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याही राजीनाम्याची मागणी केली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच सरकारकडून याबाबत काही ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला जात होता. यादरम्यानच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नीट पेपरफुटी प्रकरणी दोषींना लवकरच शिक्षा होईल. फास्ट-ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. नरेंद्र मोदी यांनी सीजेपी बाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला. तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात ही अत्यंत मोठी घोषणा केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. अखेर सरकारकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. थेट नरेंद्र मोदी यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.















