टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आज भाव चांगलेच घसरले… जाणून घ्या दर पटापट

On: June 24, 2026 10:49 AM
Follow Us:

Gold Price Today 24 June 2026 Latest News Updates in Marathi : देशभरातील सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर झाला आहे, आत्तापर्यंत सोन्याचे दर सतत वरखाली होत होते, मात्र आज 24 जून रोजी सोन्याचे दर… जाणून घ्या एका क्लिकवर !

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा उलटफेर ! आज भाव चांगलेच घसरले...  जाणून घ्या दर पटापट

देशात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. 24 जूनच्या सकाळी राजधानी दिल्लीत 24 -कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,44,740 रुपयांपर्यंत खाली आला. त्याआधीच्या दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 % शुद्ध सोन्याच्या दरात 3000 रुपयांची (किंवा 2 टक्क्यांची) घसरण झाली आणि तो दर प्रति 10 ग्रॅम1, 49, 300 रुपयांवर आला. परदेशी बाजारपेठांमध्ये डॉलर वधारलं असून त्याता मुख्य परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर झाला आहे. त्यांच्यावर दबाव निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा व्यवहार प्रति औंस 4121.10 डॉलर्सवर होत आहे.

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

राजधानी दिल्लीत 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनं हे 1,44,740 रुपयांना तर 22 कॅरेटचं सोनं हे 1,32,690 रुपयांना मिळतंय. तर मुंबई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत ही 1, 32, 540 रुपये असून 24 कॅरेट च्या 10 ग्रॅम सोन्यासाठी आज 1,44,590 रुपये मोजावे लागतील.

सोन्याचे सर्वाधिक भाव हे चेन्नईत असून तिथे 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं 1, 47 , 920 रुपयांना आणि 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,35, 590 रुपये इतका आहे, पुणे आणि बंगळुरूतील देखील सोन्याचे भाव समोर आले असून 24 कॅरेट सोनं 1,45, 590 रुपयांना तर 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1, 32 , 540 रुपयांना मिळतंय.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 132690 144740
मुंबई 132540 144590
अहमदाबाद 132590 144640
चेन्नई 135590 147920
कोलकाता 132540 144590
हैदराबाद 132540 144590
जयपुर 132690 144740
भोपाळ 132590 144640
लखनऊ 132690 144740
चंदीगड 132690 144740

चांदीचे दर किती ?

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घट झाली आहे, 24 जून रोजी चांदीचीकिंत घसरून 2, 44, 900 रुपये प्रति किलो इतकी झाली. तर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हर 62.27 डॉलर प्रति औंस आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now