टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

इराणचा 2 देशांमध्ये मोठा हल्ला, ज्याची भीती तेच घडले, जगात खळबळ, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. इराणकडून मोठे हल्ले करण्यात आली. दोन देश इराणच्या निशाण्यावर आहेत. इराण आणि अमेरिका युद्ध थांबावे, ही जगाची इच्छा असतानाच पुन्हा तणाव वाढला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम शांतता करार चर्चा सुरू आहे. मात्र, आता यात मोठी ठिंगणी पडलीये. युद्ध थांबायचे सोडून पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. इस्त्रायल सतत हल्ले करत असल्याने आता इराण पेटून उठला. अमेरिकेने इस्त्रायलला हल्ले थांबवण्यास सांगितले. मात्र, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने इराण आक्रमक झाला. इराणकडून कुवेत, बहरीन आणि अमेरिकेच्या लष्कर तळांवर मोठी हल्ले करण्यात आली. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी ही हल्ले इराणकडून करण्यात आली. ज्यामुळे आता परिस्थिती अधिक चिघळल्याचे बघायला मिळतंय. त्यानंतर अमेरिकेच्या लष्कराने प्रतिउत्तर म्हणून इराणच्या केशम बेट आणि इतर काही तळांवर हल्ला केल्याचे सांगितले जाते. मात्र, अमेरिकेने हा दावा खोडून काढला. मध्य पूर्वेत शांतता व्हावी, ही जगाची इच्छा असताना प्रत्यक्षात उलटेच घडत आहे. तणाव कमी व्हायचा तर अधिक वाढत आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एक निवेदन जारी केले. त्यात त्यांनी म्हले की, तेहरानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले.पण आम्ही त्यांचे हे हल्ले अयशस्वी केले. हवेतच ती क्षेपणास्त्र नष्ट केली. इराणची कुवेतवर डागलेली क्षेपणास्त्रे एकतर लक्ष्यापासून चुकली, त्यानंतर आम्ही काही हवेतच नष्ट केली. बहरीनची तीन डागलेली क्षेपणास्त्रे देखील अमेरिका आणि बहरीनच्या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे रोखण्यात आली.

इराणने थेट एकाच वेळी दोन देशांवर हल्ला केला, ज्याने एकच खळबळ उडाली. परिस्थिती भयंकर असताना इराण माघार घेत नाही. काही देश या युद्धात अमेरिकेसह इस्त्रायलला मदत करत असल्याने इराणचा संताप बघायला मिळत आहे. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून होर्मुज खाडी बंद आहे.

हल्ल्यानंतर कुवेतमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. लोकांना सुरक्षितस्थळी राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. कुवेती लष्कराने एक्सवर पोस्ट करत लिहिले आहे की, कुवेती हवाई संरक्षण प्रणाली सध्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा सामना करत आहे. जर स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले तर ते हवाई संरक्षण प्रणालीने हल्ले रोखल्याचा परिणाम आहे, असे म्हटले. मात्र, तणाव पुन्हा एकदा वाढला आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now