टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Manoj Jarange Patil Hunger Strike : रखरखत्या उन्हात उपोषण, ना अन्न-पाणी ना चप्पल, बळी गेल्यास सरकार जबाबदार; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

Maratha Reservation Manoj Jarange Patil Hunger Strike : ‘कितीही जीवाची लाही लाही झाली तरी हरकरत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झालाय, तर आपण आपली कदर का करायची’, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत, 30 मे पासून प्रखर उन्हात बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. देशात कुठेच झालं नाही, असं कठोर उपोषण करणार असल्याचं स्पष्ट करताना जरांगे-पाटील यांनी ‘उष्माघातानं बळी गेल्यास त्याला सरकार जबाबदार असेल’, असा इशारा दिला. उपोषणादरम्यान, मराठा समाजातील बांधवांनी अंतरवाली सराटीकडे येऊ नये’, असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे. ते आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मनोज जरांगे काय म्हणाले?

काही दिवसापूर्वी मनोज जरांगेंनी आमरण उपोषणाची घोषण केली होती. त्यानंतर, भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगेंना भेटायला आले होते. पण त्यानंतरही सरकार दरबारी आरक्षणासाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे हे अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या बोलण्यातून उद्वेग आणि संताप दिसत होता. त्यातूनच त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, ‘मी येत्या 30 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. देशात कुठेच असं झालं नसेल असं उपोषण होणार आहे. मागच्यावेळी उपोषण करताना मंडप टाकला होता. यावेळी मंडप टाकला जाणार नाही. मी सावलीत बसून उपोषण करणार नाही. असाच जाऊन बसणार आहे. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात मी बसणार आहे. मेलो तर मेलो. कुणीही समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नका’, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

चर्चेसाठी वेळ दिला आता कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. उष्माघातानं बळी गेला तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार जबाबदार असेल. सरकारचा नाहीतर माझा तुकडा पडेल. सरकारला आता वेळ तरी किती देऊ? उपोषणात पाणी, अन्न, चप्पल साऱ्या गोष्टींचा त्याग करणार आहे. मराठा समाजाच्या मुलांचा सरकारने उन्हाळा केला. देशात कुठेच झालं नाही असं कठोर उपोषण मी करणार आहे’, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

 

मोर्चे काढले तरीही आरक्षण नाही

‘मराठ्यांती मतं तुम्हाला हवीत, पण आरक्षण दिलं जात नाही. राज्यभरात मराठा तरुणांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपोषणात मेलो तर मेलो तरी चालेल. बलिदान गेलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकार अद्याप नोकरी देईना. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? तीन लाख कुणबी प्रमाणपत्र दिले म्हणता, उपकार केले का?’ असा संतप्त सवालही जरांगे पाटील यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, ‘मला आता आरपारची लढाई लढायची आहे. सगळ्या मागण्या सांगितल्या, सर्व समजून सांगितलं तरी आरक्षण नाही. प्रेमानं सांगितलं, मोर्चे काढले तरीही आरक्षण नाही. मराठ्यांची लेकरंबाळं अधिकारी झाली पाहिजेत’, असंही ते म्हणाले. ‘पश्चिम महाराष्ट्रात सधन, फळबागा आहेत म्हणता, ओबीसीकडेही आहेत. सधन आणि फळबागा हा काय आरक्षणाचा निकष आहे का?’, असं मनोज जरांने पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. आता त्यांच्या या आमरण उपोषणाला सरकार काय उत्तर देतं, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले

देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट  

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

Mount Everest: एव्हरेस्ट शिखरावर विक्रमी चढाई केली, पण उतरताना आक्रीत घडलं; दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी अंत

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..

मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच? शिवसेना 7 जागांवर ठाम, आता भाजपच्या भूमिकेकडं लक्ष